रस्त्यावर लुटमारीचा धंदा बंद होताच सराईत गुन्हेगार टीसी बनला, प्रवाशाच्या सतर्कतेमुळे बिंग फुटलं

रस्त्यावर लुटमारीचा धंदा बंद झाल्यानंतर सराईत गुन्हेगार बनावट टीसी बनला आणि त्याने रेल्वेप्रवाशांना लुटण्याचे काम सुरू केले (Railway Police arrest Fake TC at Kalyan station).

रस्त्यावर लुटमारीचा धंदा बंद होताच सराईत गुन्हेगार टीसी बनला, प्रवाशाच्या सतर्कतेमुळे बिंग फुटलं
रस्त्यावर लुटमारीचा धंदा बंद होताच सराईत गुन्हेगार टीसी बनला, प्रवाशाच्या सतर्कतेमुळे आरोपी गजाआड

कल्याण (ठाणे) : रस्त्यावर लुटमारीचा धंदा बंद झाल्यानंतर सराईत गुन्हेगार बनावट टीसी बनला आणि त्याने रेल्वेप्रवाशांना लुटण्याचे काम सुरू केले. एका प्रवाशाच्या सतर्कतेमुळे आशिष सोनवणे नावाच्या या भामट्याचे बिंग फुटले. कल्याण रेल्वे पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. त्याच्यावर सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. एवढेच नाही तर तो घराबाहेर पडण्यासाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलच्या एका कर्मचाऱ्याच्या आयकार्ड सुद्धा वापरत असल्याचे समोर आले आहे (Railway Police arrest Fake TC at Kalyan station).

नेमकं प्रकरण काय?

कल्याणमध्ये राहणारे कुमार जाधव हे आपल्या कुटुंबासह आपल्या मूळ गावी परभणीला चालले होते. मंगळवारी संध्याकाळी त्यांना ट्रेन पकडायची होती. कल्याण स्टेशनच्या फलाट नंबर चारवर ट्रेनच्या प्रतीक्षेत उभे असताना त्यांच्याजवळ एक टीसी आला. त्याने तिकीट विचारले, कुमार जाधव यांनी या टीसीला तिकीट दाखवले. मात्र तुमच्या पत्नीच्या अँटीजेन्ट टेस्ट रिपोर्ट नसल्याने तुम्हाला दंड भरावा लागेल, असे टीसीने सांगितले (Railway Police arrest Fake TC at Kalyan station).

पोलिसांच्या चौकशीत बनावट टीसीचे बिंग फुटले

कुमार यांना या टीसी संदर्भात शंका आली. त्यांनी त्वरित याची माहिती स्टेशनवरील पोलीस कर्मचाऱ्यांना दिली. कल्याण आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी या टीसीची विचारपूस सुरु केली. पोलिसांच्या चौकशीत सदर व्यक्ती बनावट टीसी असल्याचे उघड झाले.

आरोपी विरोधात याआधीच सात गुन्हे

अशिष सोनावणे असे या बनावट टीसीच्या नाव असून तो कोळसेवाडी येथील शिवाजी कॉलनी परिसरात राहणार आहे. त्याचावर कल्याण-डोंबिवलीत सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. आशिष जवळ एक ओळखपत्र सुद्धा सापडले आहे. हे ओळखपत्र त्याच्या एका मित्राचे आहे जो कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये कर्मचारी आहे. घराबाहेर पडण्यासाठी आशिष हा ओळखपत्र वापरत असल्याचे समोर आले आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी गेल्या एक महिन्यात अशा 3 बनावट टीसींना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांची प्रतिक्रिया

या प्रकरणावर कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मीक शार्दुल यांनी प्रतिक्रिया दिली. आशिष हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने याआधी अजून किती प्रवाशांना गंडा लावला आहे, याचा तपास सुरू आहे. रेल्वे पोलिसात त्याच्यावर याआधी देखील एक गुन्हा दाखल आहे, अशी माहिती वाल्मीक शार्दुल यांनी दिली.

हेही वाचा :

दारुच्या नशेत भल्या पहाटे नंगानाच, पत्नीला मारहाण, पोटच्या मुलाचं डोकं भींतीवर आपटलं, कुटुंबाचा दोष नेमका काय?

39 वर्षीय आरोपीचा महिलेवर बलात्कार, 17 वर्षीय तरुणाकडून व्हिडीओ शूट, धमकावत लैंगिक अत्याचार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI