VIDEO : उल्हासनगरमध्ये रिक्षा चालकाकडून झाडाची चोरी, सीसीटीव्हीमध्ये थरार कैद

उल्हासनगरात एका रिक्षाचालकाने चक्क झाड चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Rickshaw driver theft Tree in Ulhasnagar)

VIDEO : उल्हासनगरमध्ये रिक्षा चालकाकडून झाडाची चोरी, सीसीटीव्हीमध्ये थरार कैद
Rickshaw driver theft Tree in Ulhasnagar
| Updated on: May 27, 2021 | 2:44 PM

ठाणे : उल्हासनगरात एका रिक्षाचालकाने चक्क झाड चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 5 भागात घडली आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.  (Rickshaw driver theft Tree in Ulhasnagar)

सीसीटिव्हीत दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प 5 भागातील जॅकी प्लाझा हॉटेल परिसरात ही घटना घडली आहे. उल्हासनगरात एक रिक्षा चालक शोभेचं झाडं चोरल्याची घटना घडली. रविवारी रात्री दीडच्या सुमारास तिथे एक रिक्षा आली आणि रिक्षा चालकाने झाड उचलून रिक्षात भरलं. यावेळी रिक्षेत आणखी एक व्यक्ती बसल्याचेही दिसत आहे.

ही झाड चोरीची सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मात्र अद्याप पोलिसांकडे याबाबत कुठलीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. तसेच हा रिक्षा चालक हे झाड का चोरत होता? त्याची कारण काय? याबाबतही काहीही समोर आलेले नाही. (Rickshaw driver theft Tree in Ulhasnagar)

संबंधित बातम्या : 

आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर वीज पुरवठा खंडीत करु, कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

ठाण्यात ठेकेदार, पालिका अधिकाऱ्यांमुळेच महामारी पसरणार; राष्ट्रवादीचा दावा