ठाण्यात सिरो सर्व्हेला सुरुवात, अँटिबॉडीचे प्रमाण तपासले जाणार, सहकार्य करण्याचे महापौर यांचे आवाहन

| Updated on: Oct 12, 2021 | 6:12 PM

कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेचे नियोजन करण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिका हद्दीत सिरो सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. यामध्ये कोविड होऊन गेलेल्या व लसीकरण झालेल्या विविध वयोगटातील नागरिकांमध्ये प्रतिपिंडे (अॅण्टीबॉडीज) तयार झाली आहेत की नाहीत याची तपासणी करण्यासाठी केली जाईल.

ठाण्यात सिरो सर्व्हेला सुरुवात, अँटिबॉडीचे प्रमाण तपासले जाणार, सहकार्य करण्याचे महापौर यांचे आवाहन
SERO SURVEY
Follow us on

ठाणे : कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेचे नियोजन करण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिका हद्दीत सिरो सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. यामध्ये कोविड होऊन गेलेल्या व लसीकरण झालेल्या विविध वयोगटातील नागरिकांमध्ये प्रतिपिंडे (अॅण्टीबॉडीज) तयार झाली आहेत की नाहीत याची तपासणी करण्यासाठी केली जाईल. या सिरो सर्व्हिलयन उपक्रमाची सुरूवात आज महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी महापौरांनी स्वत: सिरो सर्व्हिलयनची तपासणी करुन नागरिकांमध्ये या तपासणीबाबत विश्वास निर्माण केला. तसेच उपक्रमासाठी आरोग्यकेंद्रात येणाऱ्या नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले.

प्रतिपिंडे तयार झाली का? त्याचे प्रमाण किती ? तपासले जाणार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक नागरिक बाधित झाले तर काहींना जीव गमवावे लागले. कोविड-19 चा विषाणू एका व्यक्तीला पुन्हा पुन्हा बाधित करीत करतो. तसेच कोविड-19 च्या लसीकरणानंतरही या विषाणूची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोविड-19 विषाणूची व त्या विषाणूमुळे मानवी शरीरात होणाऱ्या परिणामांची पूर्णत: उकल झालेली नाही. कोविड-19 बाधित जनसमुदायामध्ये कोविड-19 ची प्रतिपिंडे निर्माण होत असतात. या प्रतिजैविकांमुळे काही प्रमाणात कोविड-19 च्या आजारापासून संरक्षण मिळते असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. तसेच लसीकरणानंतरही ही प्रतिपिंडे कोविड-19 या आजारापासून संरक्षण देतात. महापालिका हद्दीत नागरिकांमध्ये अशा प्रकारची प्रतिपिंडे (अॅण्टीबॉडीज) तयार झाली आहेत का? त्याचे प्रमाण किती आहे? किती नागरिकांपर्यत लसीकरणानंतर प्रतिपिंडे तयार झाली आहेत आदीची तपासणी करण्याचा कार्यक्रम सिरोसर्व्हिन्स माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. या अहवालानुसार तिसऱ्या लाटेवर पूर्ण मात करण्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करणे सोईचे होणार आहे, अशी माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिलीय.

माहिती पूर्णत: गोपनीय ठेवली जाणार

हा सर्व्हे संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात होणार असून लोकसंख्येवर आधारित आहे. त्यामुळे ठाण्यात अंदाजे 800 ते 900 नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी प्रभागसमितीनिहाय संबंधित आरोग्यकेंद्रात केली जाईल. जे नागरिक तपासणीसाठी येतात, त्या नागरिकांची समंती घेवूनच त्यांची सर्व माहिती ॲपवर नोंदवली जाईल. त्यानंतर त्या नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेऊन प्रतिपिंडांची चाचणी होणार आहे. ही माहिती पूर्णत: गोपनीय ठेवली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितेले.

तरी आरोग्य केंद्रात येणाऱ्या नागरिकांनी या तपासणीसाठी घाबरुन न जाता महापालिकेच्या उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक, दिल्ली, जम्मू-काश्मीरमध्ये ‘लोन वुल्फ अटॅक’ करण्याच्या तयारीत, मोठा कट उधळला

VIDEO: तुम्ही असं आजही म्हणता की, तुम्ही जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आहात?; पंकजा हसल्या अन् म्हणाल्या…

फडणवीस म्हणाले, मी मुख्यमंत्री नाही असं वाटतंच नाही; पंकजा मुंडे म्हणतात, आनंद आहे!