मुंबई महापालिकेचा पाचवा सेरो सर्व्हे जाहीर; 86.64 टक्के मुंबईकर नागरिकांमध्ये आढळली कोविड – 19 प्रतिपिंड

मागील सर्वेक्षणांच्‍या तुलनेत झोपडपट्टी तसेच बिगर झोपडपट्टी परिसरांमध्‍ये प्रतिपिंड आढळण्‍याचे प्रमाण वाढले आहे. प्रतिपिंड आढळले असले तरी, मास्‍कचा उपयोग, हातांची स्‍वच्‍छता आणि सुरक्षित अंतर इत्‍यादी खबरदारी बाळगणे आवश्‍यकच आहे.

मुंबई महापालिकेचा पाचवा सेरो सर्व्हे जाहीर; 86.64 टक्के मुंबईकर नागरिकांमध्ये आढळली कोविड - 19 प्रतिपिंड
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 6:40 PM

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता महापालिकेने सर्व वयोगटातील नागरिकांच्या शरीरातील अँटीबॉडीज तपासण्यासाठी पाचवा सेरो सर्व्हे केला होता. या सर्व्हेचा अहवाल आज जाहीर करण्यात आला. या अहवालात 86.64 टक्के मुंबईकर नागरिकांमध्ये कोविड – 19 प्रतिपिंड आढळली. कोविडच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात केलेल्‍या पाचवे सेरो सर्वेक्षणातील निष्‍कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. (Mumbai Municipal Corporation announces fifth sero survey; covid 19 antibodies found in 86.64 per cent Mumbaikars)

झोपडपट्टी तसेच बिगर झोपडपट्टी परिसरांमध्‍ये प्रतिपिंड आढळण्‍याचे प्रमाण वाढले

पूर्ण किंवा अंशतः लसीकरण झालेल्‍यांपैकी 90.26 टक्‍के नागरिकांमध्‍ये प्रति‍पिंड आढळली. तर लसीकरण न झालेल्‍यांपैकी 79.86 टक्‍के नागरिकांमध्‍ये प्रति‍पिंड आढळली. मागील सर्वेक्षणांच्‍या तुलनेत झोपडपट्टी तसेच बिगर झोपडपट्टी परिसरांमध्‍ये प्रतिपिंड आढळण्‍याचे प्रमाण वाढले आहे. प्रतिपिंड आढळले असले तरी, मास्‍कचा उपयोग, हातांची स्‍वच्‍छता आणि सुरक्षित अंतर इत्‍यादी खबरदारी बाळगणे आवश्‍यकच आहे. कोविड-19 विषाणू संसर्गजन्य साथरोगाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे महानगरपालिका क्षेत्रात पाचवे सेरो सर्वेक्षण करण्यात आले. अर्थात रक्‍त नमुन्‍यांची चाचणी करुन प्रतिपिंड (अॅण्‍टीबॉडीज्) शोधण्‍याबाबतचे सर्वेक्षण करण्‍यात आले. सर्वेक्षणानुसार, एकूण 86.64 टक्‍के नागरिकांमध्‍ये प्रतिपिंडांचे अस्‍त‍ित्‍व दिसून आले आहे.

कोविड लसीकरण झालेल्‍या नागरिकांपैकी प्रतिपिंड विकसित झालेल्‍यांची संख्‍या 90.26 टक्के तर लसीकरण न झालेल्‍यांपैकी 79.86 टक्‍के नागरिकांमध्‍ये प्रतिपिंड आढळली आहेत. विशेष म्‍हणजे, मागील सर्वेक्षणांच्‍या तुलनेत झोपडपट्टी तसेच बिगर झोपडपट्टी परिसरांमध्‍ये देखील प्रतिपिंड विकसित होण्‍याचे प्रमाण वाढल्‍याचा निष्‍कर्षही यातून समोर आला आहे.

या पाचव्‍या सेरो सर्वेक्षणातील ठळक निष्‍कर्ष पुढीलप्रमाणे

1. बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील या सर्वेक्षणात केलेल्‍या चाचण्‍यांपैकी एकूण 86.64 टक्के नागरिकांमध्ये सेरो सकारात्मकता अर्थात संबंधित प्रतिपिंडे (Sero positivity / IgG Antibodies) आहेत. यामध्‍ये झोपडपट्टी परिसरांमध्‍ये सुमारे 87.02 टक्‍के तर बिगर झोपडपट्टी भागांमध्‍ये सुमारे 86.22 टक्‍के नागरिकांमध्‍ये प्रतिपिंड आहेत. 2. सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार पुरुषांमध्ये 85.07 टक्के इतकी तर महिलांमध्ये 88.29 टक्के इतकी सेरो सकारात्मकता आढळून आली. 3. सर्वेक्षण केलेल्‍या नागरिकांपैकी सुमारे 65 टक्‍के नागरिकांनी कोविड लस घेतली असून उर्वरित 35 टक्‍के नागरिकांनी कोविड लसीचा एकही डोस घेतलेला नाही. 4. लस घेतलेल्‍या नागरिकांचा विचार करता, सुमारे 90.26 टक्‍के नागरिकांमध्‍ये प्रतिपिंड विकसि‍त झालेली आहेत. 5. ज्‍यांनी कोविड लस घेतलेली नाही अशा नागरिकांपैकी सुमारे 79.86 टक्‍के नागरिकांमध्‍येही प्रतिपिंड विकसित झाल्‍याचे दिसून आले. 6. सर्वेक्षणात घेतलेल्‍या नमुन्‍यांपैकी सुमारे 20 टक्‍के हे आरोग्‍य कर्मचाऱ्यांचे होते. त्‍याचा विचार करता, या गटामध्‍ये प्रतिपिंड असण्‍याचे प्रमाण हे 87.14 टक्के इतके आहे. 7. विविध वयोगटांचा विचार करता, 80 ते 91 टक्‍के दरम्‍यान सेरो-सकारात्‍मकता / प्रतिपिंड अस्‍त‍ित्‍व आढळून आले आहे.

या पाचव्‍या सेरो सर्वेक्षणातील ठळक अन्‍वयार्थ पुढीलप्रमाणे

1. मागील सेरो सर्वेक्षणांच्‍या तुलनेत विचार करता, मुंबईतील सर्व 24 प्रशासकीय विभाग मिळून, झोपडपट्टी तसेच बिगर झोपडपट्टी परिसरांमध्‍ये प्रतिपिंड अस्‍त‍ित्‍व असणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरित्‍या वाढले आहे.

2. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरे यांची तुलना करता, दोन्‍ही भागांमध्‍ये प्रतिपिंड विकसि‍त झाल्‍याचे प्रमाण जवळपास सारखेच आहे. त्‍यामध्‍ये लक्षणीय असा फरक आढळलेला नाही.

3. पाचव्‍या सेरो सर्वेक्षणानुसार, झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसरातील नागरिकांमध्‍ये जवळपास सारख्‍याच संख्‍येने प्रतिपिंड आढळून आली आहेत. दोन्‍ही परिसरांतील आकड्यांमध्‍ये दिसणारा फरक हा नगण्‍य आहे.

4. त्‍याचप्रमाणे, पुरुष व महिलांमध्ये देखील दिसलेली सेरो सकारात्मकता पाहता, या दोन्‍ही गटातील सेरो अस्‍त‍ित्‍वाच्‍या आकड्यांमध्‍येही किंचितसा फरक आहे.

5. कोविड लसीचा एकही डोस न घेतलेल्‍या नागरिकांच्‍या तुलनेत, लसीचा एक किंवा दोन्‍ही डोस घेतलेल्‍या नागरिकांमध्‍ये प्रतिपिंड हे लक्षण‍ीयरित्‍या अधिक आढळले आहेत. (Mumbai Municipal Corporation announces fifth sero survey; covid 19 antibodies found in 86.64 per cent Mumbaikars)

इतर बातम्या

Doctor G : रकुल प्रीत सिंहने ‘डॉक्टर जी’ साठी घेतलं खास वैद्यकीय प्रशिक्षण; फर्स्ट लुक प्रदर्शित!

तरुणाचा एक विचार अन् शेती व्यवसयात अमुलाग्र बदल

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.