AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुणाचा एक विचार अन् शेती व्यवसयात अमुलाग्र बदल

ही कहाणी आहे तामिळनाडूतील निर्मल राघवन यांची. दुबईत काम करणाऱ्या निर्मलने गाझा या शक्तिशाली चक्रीवादळाचा सामना करीत आपला विचार बदलला. त्याच्या एका विचाराने या भागातील शेतकऱ्यांचे जीवन बदलून गेले असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. नेमके काय झाले तर मग बघू

तरुणाचा एक विचार अन् शेती व्यवसयात अमुलाग्र बदल
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Sep 17, 2021 | 6:16 PM
Share

मुंबई : आलेल्या संकटाचा सामना करायचा आणि त्यामधूनच संधी शोधायची हे वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. पण हे एका तरुणाने करुन दाखवले आहे. त्याच्या एका चांगल्या विचाराने त्याचे आणि शेतकऱ्यांचे नशीब बदलून टाकले आहे. ही कहाणी आहे तामिळनाडूतील निर्मल राघवन यांची. दुबईत काम करणाऱ्या निर्मलने गाझा या शक्तिशाली चक्रीवादळाचा सामना करीत आपला विचार बदलला. त्याच्या एका विचाराने या भागातील शेतकऱ्यांचे जीवन बदलून गेले असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. नेमके काय झाले तर मग बघू

निर्मल राघवन हा तरुण दुबईमध्ये काम करायचा. 2018 मध्ये दुबईहून तामिळनाडूतील त्यांच्या गावी आला. मात्र गावात आल्यानंतर बंगालच्या उपसागरातील वादळामुळे त्याच्या आयुष्याची दिशाच बदलेल, असे राघवन यांनाही वाटले नव्हते. 16 नोव्हेंबर 2018 रोजी राघवन तंजावर जिल्ह्यातील पेरावुराणी शहरातील नादियाम या आपल्या गावात विश्रांती करीत होते. अचानक गाझा हे शक्तिशाली चक्रीवादळ त्याच्या गावाला धडकले. या वादळामुळे मोठे नुकसान झाले. हजारो घरे उद्ध्वस्त एवढेच नाही तर लाखो विजेचे खांब कोलमडले.

या भागात सुमारे एक कोटी नारळाची झाडे उन्मळून पडली. या दरम्यान, तंजावर जिल्ह्यातील ऑर्थानाडू, पट्टुक्कोटताई आणि पेरावुराणी येथे जोरदार वाऱ्यांनी कहर केला. हा परिसर तीन क्षेत्रे नारळ लागवडीसाठी ओळखला जात होता. या नारळाच्या झाडावर येथील ८० टक्के कुटुंबांचा उदरनिर्वाह होता.चक्रीवादळाचा परिणाम पाहिल्यानंतर राघवन यांनी नोकरी सोडली आणि मदतकार्य सुरू केले. या दरम्यान त्यांच्या हे लक्षात आले की, या भागातील शेतकरी नारळाच्या लागवडीवर अवलंबून आहेत. मात्र, हे सर्वजण धान्य आणि ऊसासारख्या चांगल्या उत्पादनाकडे दुर्लक्ष करतात. त्यांनी त्या शेतकऱ्यांना गवत आणि ऊसाच्या लागवडीकडे परत आणण्याचा निर्णय घेतला. मात्र, या भागातील पाण्याची कमतरता हे एक मोठे गंभीर आव्हान होते.

त्यामुळे सर्वप्रथम त्यांनी या भागात पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी सर्वांना एकत्र घेत तेथील तलावाला नवचैतन्य देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. राघवन यांनी आपल्या जुन्या मित्रांसह या भागात शाश्वत शेतीच्या विकासासाठी एकात्मिक शेतकरी संघटना कैफा या संघटनेची स्थापना केली. यामधून या परिसरात जतक्रांती झाली आहे. सर्वप्रथम कैफाच्या तरुणांनी 565 एकर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न केले. मोठा तलाव हा स्वच्छ करुन त्यामध्ये जलसंधारणाचे काम केले आहे. त्यामुळे 400 फुटावर गेलेली पाणीपातळी आता 40 फुटावर आली आहे.

कैफाच्या प्रयत्नांमुळे पाण्याची पातळी सुधारते

त्यानंतर कैफाच्या टीमने प्रथम पेरावोरानी येथील मोठा तलाव स्वच्छ करून पाण्याची कमतरता पूर्ण केली आणि हा तलाव जिवंत केला. त्यामुळे तलावातील पाण्यामुळे 6000 एकरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली आली आहे. एकेकाळी 300 ते 400 फूट खाली असलेल्या या भागातील भूजल पातळी आज 40 फुटांवर पोहोचल्याचा फायदा कैफाच्या जलसंधारणाच्या प्रयत्नांमुळे झाला आहे. यामुळे येथली शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. राघवन आणि त्यांच्या टीमने परिसरातील इतर जलसिंचनाच्या कामास सुरुवात केली.

शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत आहे

आज तंजावर, तिरुवरूर, नागपट्टिनम, पुदुक्कोटताई आणि शिवांगगाई जिल्ह्यात आपल्या कारवायांचा प्रसार करणारी कैफा टीम 95 सरोवराला नवचैतन्य देत आहे. ते प्रत्येक तलावातून गाळ साफ करतात, खोल करतात आणि पाण्याने भरण्यासाठी त्याची पूर्ण काळजी घेतात. त्याचबरोबर तलावाच्या मधोमध देसी झाडे लावून ते तलाव बांधतात. कैफा पथकाने स्थानिकांच्या सहकार्याने आतापर्यंत 6,50,000 रोपे लावली आहेत. शेतकरी आज ऊस आणि धानाची लागवड करत आहेत.

इतर बातम्या :

अनंत चतुर्दशीला णे बंद! फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार, अजित पवारांकडून स्पष्ट

पेट्रोल, डिझेल जीएसटीमध्ये आणण्यास विरोध करणाऱ्या आघाडी सरकारचा ढोंगीपणा उघड, भाजपचं टीकास्त्र

युती झाल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार?; मुख्यमंत्र्यांनी दानवेंच्या कानात काय सांगितलं?

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.