AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभेचे तिकीट कापल्याने लोकसभेत शह देणार?, आता या माजी आमदाराचे भावी खासदार असे बॅनर्स

आपलं तिकीट कापलं गेल्याने सुभाष भोईर हे एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सुभाष भोईर यांनी मात्र ठाकरे गटातच राहणं पसंत केलं होतं.

विधानसभेचे तिकीट कापल्याने लोकसभेत शह देणार?, आता या माजी आमदाराचे भावी खासदार असे बॅनर्स
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 3:14 PM

निनाद करमरकर, प्रतिनिधी, अंबरनाथ (ठाणे) : ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख सुभाष भोईर यांनी कल्याण लोकसभेची जागा लढवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे महाविकास आघाडीत ठाणे आणि कल्याणची जागा ठाकरे गटाला सोडण्याच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे कल्याण लोकसभेतील अंबरनाथ शहरात सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनर्सवर भोईर यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे.

सुभाष भोईर हे माजी आमदार

सुभाष भोईर हे २०१४ साली कल्याण ग्रामीण विधानसभेतून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले होते. मात्र २०१९ सालच्या निवडणुकीत त्यांचं तिकीट कापत केडीएमसीचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना संधी देण्यात आली होती. त्या निवडणुकीत रमेश म्हात्रे यांचा पराभव होऊन मनसेचे राजू पाटील हे आमदार म्हणून निवडून आले होते.

सुभाष भोईर शिंदे कुटुंबीयांवर नाराज

आपलं तिकीट कापलं गेल्याने सुभाष भोईर हे एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सुभाष भोईर यांनी मात्र ठाकरे गटातच राहणं पसंत केलं होतं. इतकंच नव्हे, तर कल्याण लोकसभेचं संपर्कप्रमुखपद देखील त्यांना देण्यात आलं होतं.

बॅनर्सवर भावी खासदार असा उल्लेख

यानंतर आता सुभाष भोईर यांनी आपलं तिकीट कापल्याचा वचपा काढण्यासाठी थेट श्रीकांत शिंदे यांनाच शह देण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. कारण सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ शहरात लावलेल्या बॅनर्सवर त्यांचा ‘भावी खासदार’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाणे आणि कल्याण या लोकसभेच्या दोन जागा ठाकरे गटाला सोडल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तसं झालं, तर आपल्यालाच लोकसभेचं तिकीट मिळावं आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाचा वचपा काढता यावा. असा सुभाष भोईर यांचा प्रयत्न आहे का? असा प्रश्न यानंतर उपस्थित झालाय.

PM मोदींनी अहमदाबादच्या दुर्घटनास्थळाची केली पाहणी अन्..
PM मोदींनी अहमदाबादच्या दुर्घटनास्थळाची केली पाहणी अन्...
एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडींग, मोठं कारण आलं समोर
एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडींग, मोठं कारण आलं समोर.
विमान दुर्घटनेत बचावलेल्या प्रवाशाचा अंगावर काटा आणणारा अनुभव
विमान दुर्घटनेत बचावलेल्या प्रवाशाचा अंगावर काटा आणणारा अनुभव.
विमान दुर्घटनेतल्या वस्तीगृहातल्या विद्यार्थ्यांनी सांगितली आँखों देखी
विमान दुर्घटनेतल्या वस्तीगृहातल्या विद्यार्थ्यांनी सांगितली आँखों देखी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मृतांच्या नातेवाईकांना भेटले
पंतप्रधान नरेंद्र मोदी मृतांच्या नातेवाईकांना भेटले.
मृतांच्या 192 नातेवाईकांच्या DNA चाचण्या पूर्ण
मृतांच्या 192 नातेवाईकांच्या DNA चाचण्या पूर्ण.
लकी नंबरनेच केला रुपाणींचा घात, त्याच तारखेला मृत्यूने कवटाळलं
लकी नंबरनेच केला रुपाणींचा घात, त्याच तारखेला मृत्यूने कवटाळलं.
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न..
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न...
टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं अन्...
टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं अन्....
विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?, 'त्या' प्रवाशानं काय केलं होतं ट्विट?
विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?, 'त्या' प्रवाशानं काय केलं होतं ट्विट?.