
“समाधानी नसलो तरी देखील व्यापक हित बघावे लागते. व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी युती केली आहे. मुंबईला युती झाली, ठाण्यात देखील झाली. व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही ठाण्यामध्ये युती केली आहे. समाधानी नसलो तरी युती धर्म म्हणून प्रत्येक कार्यकर्ता संघटना म्हणून काम करणार” असं ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर म्हणाले. “खूप वेळा युती झाली नाही. कल्याण-डोंबिवली या ठिकाणी देखील युती न करता भाजप पक्ष लढला होता. त्यावेळेस जिल्हाप्रमुख आनंद दिघे होते. मी या ठिकाणी ठाणे जिल्हा प्रमुख होतो आणि भारतीय जनता पार्टीचा अडीच वर्षासाठी महापौर झाला होता. युती झाली आहे. एकत्र येऊन भगवा फडकवणार” असं संजय केळकर म्हणाले.
“केंद्र आणि राज्यात आमचे दोन इंजिन चालू आहे. तिसरं इंजिन देखील इथे असलं पाहिजे. आम्ही पक्ष नेत्यांमुळे या ठिकाणी युती केली आहे. या ठिकाणी भगवा झेंडा फडकला पाहिजे ही आमची भूमिका आहे” असं संजय केळकर यांनी सांगितलं. “सर्व जागा आम्ही लढलो असतो. तशी आमची तयारी आमचे फॉर्म आले होते. कार्यकर्त्यांनी आठ वर्षे काम केले आहे. त्याच्यामुळे लोकांचा आशीर्वाद घेऊन असं काही नाही महापौर बसला नसता, महापौर बसला असता. परंतु आताच्या युतीच्या राजकारणात महायुतीच्या माध्यमातून आम्ही लढणार. संदर्भ बदलले असले तरी जनता जनार्दन का आशीर्वाद देणार त्याच्याप्रमाणे 100 प्लस अधिक जागा येणार” असा विश्वास संजय केळकर यांनी व्यक्त केला.
कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्याबद्दल मला माहिती नाही
“कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्याबद्दल मला माहिती नाही. मात्र सर्वसमावेश लोक प्रांतामध्ये राहत आहेत. सबका साथ सबका विकास हे मोदींनी सांगितले आहे. कृपा जी काय बोलले ते मला माहिती नाही” असं संजय केळकर म्हणाले. “ठाणेकरांसाठी जे काय करता येईल ते आम्ही मुद्दे मांडत असतो. वाहतूक कोंडी, पाणी समस्या, इंटरनल मेट्रो अशा अनेक गरजेनुसार मुद्दा आम्ही उचलला. हॅपिनेससाठी मी झटून काम करणार” असं संजय केळकर म्हणाले.