कल्याणच्या कारागृहात तब्बल 20 कैद्यांना कोरोना, तत्काळ रुग्णालयात हलवलं, प्रशासन अलर्ट

| Updated on: Oct 18, 2021 | 3:50 PM

कल्याण येथील आधारवाडी कारागृहात तब्बल 20 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कैद्यांना कोरोनाचे संक्रमण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सध्या या कोरोनाग्रस्त कैद्यांना ठाण्यात रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

कल्याणच्या कारागृहात तब्बल 20 कैद्यांना कोरोना, तत्काळ रुग्णालयात हलवलं, प्रशासन अलर्ट
CORONA
Follow us on

ठाणे : कल्याण येथील आधारवाडी कारागृहात तब्बल 20 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कैद्यांना कोरोनाचे संक्रमण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सध्या या कोरोनाग्रस्त कैद्यांना ठाण्यात रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याआधीदेखील ठाण्यातील य़ाच कारागृहात तब्बल 30 कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती.

कारागृहात तब्बल वीस कैद्यांना कोरोनाची लागण

मिळालेल्या माहितीनुसार आधारवाडी कारागृहात काही कैद्यांची प्रकृती खालावली होती. कोरोनासदृश लक्षणं आढळल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळताच त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य कैद्यांचीदेखील चाचणी करण्यात आली. नंतर तब्बल 20 रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले. सध्या या कैद्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयीची अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

आतापर्यंत 1,39,789 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. असं असलं विषाणूंचा प्रसार होतच आहे. ठाणे, मुंबई तसेच अन्य मोठ्या शहरांत नवे कोरोनाग्रस्त आढळतच आहेत. राज्यात रुग्णसंख्या 65,91,697 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत एकूण 1,39,789 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मागील चोवीस तासांमध्ये एकूण 2680 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

महाराष्ट्राने 9.14 केटी लसीकरणाचा  टप्पा पार केला

महाराष्ट्र लसीकरण मोहिमेत कायमच आग्रेसर राहिलेला आहे. रविवारी महाराष्ट्राने 9.14 केटी लसीकरणाचा टप्पा पार केला. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात रविवारी संध्याकाळपर्यंत 1,29,221 लोकांना लस टोचण्यात आली.ल सीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आतापर्यंत 9,14,34,586 लोकांचे लसीकरण झाले आहे.

सद्यस्थिती काय आहे ?

आतापर्यंत एकूण  6,32,70,144 जणांना पहिला डोस मिळालेला आहे आणि 2,81,64,442 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत 18 ते 44 वयोगटातील 3,38,90,580 जणांना पहिला डोस आणि 99,34,176 लोकांना दुसरा डोस देण्यात आलाय. तर 45+ वयोगटातील 2,59,40,566 जणांना पहिला डोस आणि 1,53,10,357 जणांनी दुसरा डोस देण्यात आलाय.

इतर बातम्या :

वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार, प्रत्येक शहरांत वाहनतळ, चेक पोस्ट नजीक ट्रॉमा केअर सेंटर्स उभारणार : मुख्यमंत्री

Video: संकटात खचून गेलेल्यांना प्रेरणा देणारा पुण्याची आजी, नेटकऱ्यांनी केला आजीला सलाम

Rules for fasting : देवी-देवतांसाठी उपवास ठेवण्यापूर्वी त्याबाबतचे नियम जाणून घ्या

(thane kalyan 20 prisoners found corona positive shifted to hospital)