ठाणे शहरातील फेरीवाल्यांवर महापालिकेची धडक कारवाई, हातगाड्या आणि टपऱ्यांवर जेसीबीचा दणका

| Updated on: Sep 06, 2021 | 12:25 AM

ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्यावतीने धडक कारवाईची मोहीम व्यापक प्रमाणात सुरुच आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशीही शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

ठाणे शहरातील फेरीवाल्यांवर महापालिकेची धडक कारवाई, हातगाड्या आणि टपऱ्यांवर जेसीबीचा दणका
ठाणे शहरातील फेरीवाल्यांवर महापालिकेची धडक कारवाई, हातगाड्या आणि टपऱ्यांवर जेसीबीचा दणका
Follow us on

ठाणे : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्यावतीने धडक कारवाईची मोहीम व्यापक प्रमाणात सुरुच आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशीही शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. हातगाडया, आणि टपऱ्या तसेच स्टॉल जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले. ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. यापुढेही ही कारवाई सुरुच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

ठाण्यातील ‘या’ भागांमध्ये महापालिकेची कारवाई

या कारवाई अंतर्गत नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमधील अलोक हॉटेल, गावदेवी, तीन हात नाका, राममारु ती रोड, तलावपाळी दुकानांसमोरील सामानांची उचलबांगडी करण्यात आली. त्याचबरोबर रस्त्यावरील फेरीवाले हटवून चार बॅग, पाच पुतळे चायनीजचा गाळा, दोन फळांच्या टोपल्या तर स्टेशन परिसर, जुनी महानगरपालिका, सुभाष पथ, जांभळी नाका, कोर्ट नाका येथील ठेले सात कटलरी बॉक्स आणि नऊ फळांच्या पाट्या जप्त केल्या आहेत.

तसेच माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील तुर्फे पाडा ब्रम्हांड, हिरानंदानी चौक ते श्रीमा शाळेच्या परिसरातील कारवाई दरम्यान 4 स्टॉल, तीन टपऱ्या आणि दोन प्लास्टीक पेपर तसेच 5 बनर पोल तोडण्यात आले. हिरानंदानी इस्टेट येथील आर्केडिया शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकानबाहेर लावलेले चार लोखंडी स्टॉलसह इतरही दुकानाबाहेर लावलेल्या हातगाडी तसेच उसाच्या चरक्यासह हिरानंदानी रोडवरील भंगार आणि जनरेटर मशीन जप्त करण्यात आली.

दिव्यात कोणत्या भागात कारवाई?

दिवा प्रभाग समितीमध्येही दिवा स्टेशन रोड, दिवा आगासन रोड, दातिवली रोड, मुंब्रादेवी कॉलनी आणि शीळ फाटा रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले तसेच परपथावरील अतिक्रमणे हटविण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली. तसेच किरकोळ विक्रेते यांच्यावर कारवाई करुन त्यांचे सामान जप्त करण्यात आले.

अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, संतोष वझरकर, अलका खैरे आणि सागर साळुंखे आदींनी अतिक्रमण विभागाचे पथक आणि पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

याआधी ‘या’ भागांमध्ये कारवाई

ठाणे महापालिकेने याआधी 3 ऑगस्टला देखील फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली होती. या कारवाईतंर्गत नौपाडा – कोपरी प्रभाग समितीमधील ठाणे स्टेशन रोड, सॅटिस परिसर, गोखले रोड, हरिनिवास सर्कल, तीन हात पेट्रोल पंप, राम मारुती रोड आणि गावदेवी मंदिर परिसर या ठिकाणी असणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करत 4 हातगाड्या, 27 दुकानासमोरील वाढीव भाग तोडण्यात आला. तलाव पाळी, एसटी डेपो, अशोक सिनेमा, प्रभात सिनेमा, जुनी महानगरपालिका, सुभाष पथ, जांभळी नाका व गडकरी रंगायतन आदी ठिकाणांच्या 3 हातगाड्या व 22 दुकानासमोरील वाढीव भाग तोडण्यात आला. यासोबतच कोपरीमधील नाखवा हायस्कूल, ठाणेकर वाडी, बारा बंगला, मंगला हायस्कूल तसेच रघुनाथ नगर, शाहिद मंगल पांडे सेवा रस्ता, आरटीओ ऑफिस व तीन हात नाका येथील 5 हातगाड्या व 23 दुकानासमोरील वाढीव भाग तोडण्यात आला.

हेही वाचा : 

शिक्षकांचा मार खाल्यामुळे भाषण द्यायला लागलो, नाहीतर शिकलोच नसतो: नितीन गडकरी

बीएसयूपीच्या घरांचे ताबापत्र देऊनही प्रत्यक्ष ताबा नाकारला; दिव्यांगांचे बुधवारी ठाण्यात कायदेभंग आंदोलन