AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video| शिक्षकांचा मार खाल्यामुळे भाषण द्यायला लागलो, नाहीतर शिकलोच नसतो: नितीन गडकरी

| Edited By: | Updated on: Sep 05, 2021 | 11:58 PM
Share

शिक्षकांचा मार खाल्या मुळे भाषण द्यायला लागलो, जर मार पडला नसता तर भाषण द्यायला शिकलो नसतो, असे उदगार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात साऊथ पब्लिक स्कुल च्या शिक्षकदिन कार्यक्रम प्रसंगी काढले.

शिक्षकांचा मार खाल्या मुळे भाषण द्यायला लागलो, जर मार पडला नसता तर भाषण द्यायला शिकलो नसतो, असे उदगार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात साऊथ पब्लिक स्कुल च्या शिक्षकदिन कार्यक्रम प्रसंगी काढले. शिक्षणातून मानवाचं जीवन बदलत असतं. देशाला महासत्ता बनवायचं असेल तर त्यासाठी विद्यार्थी घडविणे आवश्यक आहे. शिक्षक पालक मॅनेजमेंट विद्यार्थी हा एक परिवार आहे आणि या परिवारात ऐक्य असेल तर चांगले विध्यर्थी घडले आणि त्याचा देशाला फायदा होईल. आपल्या देशातील परिवार पद्धती ही संस्कारी आहे. पाश्चात्य देशात ते पाहायला मिळत नाही. सुशिक्षित असणं आणि सुसंस्कृत असन यात मोठा फरक आहे. त्यामुळे सुशिक्षित बनत असताना सुसंस्कृत बनणं महत्वाचं आहे. 100 टक्के परिपूर्ण कोणीच असू शकत नाही कितीही चांगला माणूस असला तरी त्यात काही न काही गुणदोष असतात ,गुणदोष कमी करण सातत्याने करण्याची गरज आहे. आपण सोडून जाऊ तेव्हा आपल्या कार्याची स्तुती होणं महत्वाचं आहे. ध्वनी , वायू आणि जल प्रदूषण पासून नागपूर ला मुक्त करून प्रदूषण मुक्तीत एक नंबर वर आणायचं आहे. अंबुलन्स , पोलीस गाडी वर सुमधुर हॉर्न असला पाहिजे , इतर वाहनांना भारतीय संगीताचा हॉर्न करण्याची तयारी आहे असंही मत नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.