ठाणे पालिकेला बालमृत्यूचं टेन्शन, बालमृत्यू रोखण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

| Updated on: Sep 17, 2021 | 11:30 AM

ठाण्यात बालमृत्यू होऊ नये म्हणून ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. त्यासाठी महापालिकेने तातडीने एक बैठक बोलवून ठाण्यात बालमृत्यू होऊ नये म्हणून कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. (thane municipal corporation takes child mortality review meeting)

ठाणे पालिकेला बालमृत्यूचं टेन्शन, बालमृत्यू रोखण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश
child mortality review meeting
Follow us on

ठाणे: ठाण्यात बालमृत्यू होऊ नये म्हणून ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. त्यासाठी महापालिकेने तातडीने एक बैठक बोलवून ठाण्यात बालमृत्यू होऊ नये म्हणून कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. (thane municipal corporation takes child mortality review meeting)

ठाणे महापालिकेच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या बालमृत्यू अन्वेषण समितीचा महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे काल सविस्तर आढावा घेतला. यावेळी बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश सर्व संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव जाधव, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. राणी शिंदे, स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुनीता उबाळे, बालरोगतज्ञ डॉ. शैलजा पोतदार, ठाणे अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सचे डॉ. राम गुंडाळे, स्त्रीरोगतज्ञ डॉ. संजय किनरे यांच्यासह महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्राचे तसेच खासगी हॉस्पिटलचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

4 महिन्यात 16 बालमृत्यू

या बैठकीत एप्रिल 2021 ते जुलै 2021 या काळात झालेल्या बालमृत्यूबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ठाणे महापालिका क्षेत्रात एप्रिल 2021मध्ये 1, मे 2021मध्ये 2, जून 2021मध्ये 7 तर जुलै 2021मध्ये 6 बालमृत्यू झाले आहेत. या काळात झालेल्या सर्व बालमृत्यूची वैद्यकीय कारणे समिती समोर सादर करण्यात आली.

लहान मुलांची काळजी घ्या

कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. शहरातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनांचा अवलंब करून प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश माळवी यांनी सर्व संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

गेल्या 24 तासात देशात 34 हजार 403 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 320 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 37 हजार 950 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 33 लाख 81 हजार 728 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 25 लाख 98 हजार 424 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 44 हजार 248 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 39 हजार 56 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 77 कोटी 24 लाख 25 हजार 744 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 34,403

देशात 24 तासात डिस्चार्ज – 37,950

देशात 24 तासात मृत्यू – 320

एकूण रूग्ण – 3,33,81,728

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,39,056

एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,25,98,424

एकूण मृत्यू – 4,44,248

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 77,24,25,744

गेल्या 24 तासातील लसीकरण – 63,97,972 (thane municipal corporation takes child mortality review meeting)

 

संबंधित बातम्या:

अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई, ठाणे महापालिकेची बेधडक मोहिम सुरुच

बेकायदा इमारतीवर कारवाई नको म्हणून केडीएमसी अधिकाऱ्यांनी 25 लाख घेतले, बिल्डराचा आरोप, ACB कडे चौकशीची मागणी

सिडकोने गृहनिर्माण प्रकल्प राबविताना मोकळ्या जागा, पार्किंग आदींचे नियोजन करावे, अजित पवारांची सूचना

(thane municipal corporation takes child mortality review meeting)