AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खाद्य पदार्थ ते माचिसचे बॉक्स, पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीची मदत, ठाण्याहून पाच ट्रक कोकणच्या दिशेला रवाना

अतिवृष्टीमुळे कोकणाची पुरती वाताहत झाली आहे. कोकणी माणसांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

खाद्य पदार्थ ते माचिसचे बॉक्स, पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीची मदत, ठाण्याहून पाच ट्रक कोकणच्या दिशेला रवाना
| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 6:48 PM
Share

ठाणे : अतिवृष्टीमुळे कोकणाची पुरती वाताहत झाली आहे. कोकणी माणसांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या उद्ध्वस्त संसारांना सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे पाच ट्रक कोकणाच्या दिशेने रवाना करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज दुपारी (25 जुलै) या ट्रक्सला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे हे उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पाच ट्रकभरुन साहित्याची मदत

कोकणात गेल्या अनेक दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे कोकणातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिणामी कोकणाला पुराचा मोठा फटका बसला आहे. या पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या पूरग्रस्तांना साहाय्य करण्याची संकल्पना जितेंद्र आव्हाड यांनी मांडली. त्यानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ब्रिटानिया बिस्किटांचे एक लाख पुडे, बिस्लेरी पाण्याच्या एक लाख बाटल्या, फिनेलच्या 4000 बाटल्या, 50 हजार मॅगीची पाकिटे, मेणबत्तीचे 2500 बॉक्स, 6 हजार माचिसचे बॉक्स जमा करुन ट्रकमध्ये भरले.

पाच ट्रक कोकणच्या दिशेला रवाना

तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रम खामकर, ठाणे महापालिकेचे विरोधीपक्ष नेते अश्रफ शानू पठाण आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून 800 बॉक्स पाणी, 2500 बिस्किट पाकिटे, 100 किलो फरसाण, 50 बॉक्स फिनेल, 1200 झाडू असे साहित्य पाच ट्रकमध्ये भरून कोकणाच्या दिशेने रवाना केले.

राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते उपक्रमात सहभागी

हे साहित्य थेट पूरग्रस्तांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. त्यासाठी ठाणे शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ट्रक्ससोबत गेले आहेत. यावेळी शहर महिलाध्यक्षा सुजाताताई घाग, शहर महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, शहर सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, नितीन पाटील, विजय भामरे, विक्रांत घाग,दिलीप नाईक, अ‍ॅड. विनोद उतेकर, दिपक क्षत्रीय, राजू चापले, सचिन पंधेरे, मनोज कोकणे, रचना वैद्य, अजित सावंत, सुनील पाटील ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, निलेश कदम, विलास पाटील, विशाल खामकर, संतोष सहस्त्रबुद्धे, रामचंद्र सकपाळ, सुधीर शिरसाट, समीर नेटके,सुमीत गुप्ता, संतोष घोणे, दिलीप यादव, संदीप ढकोलिया, दिपक पाटील, युवक पदाधिकारी अभिषेक पुसाळकर, दिनेश बने, श्रीकांत भोईर, संतोष मोरे, राजेश कदम, महिला पदाधिकारी शोभा डे, राधिका वामन, कांता गजमल, जान्हवी वोरा, अनिता मोटे, वंदना लांडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : पाण्याचे दोन टँकर, खाद्यपदार्थ ते 5 हजार सतरंजी, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेचे 100 अधिकारी-कर्मचारी रवाना

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.