AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट! चौथ्या आरोपीची ओळख पटली, दोन महिलांची…

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी नऊ पथके तयार केली असून, चौथ्या आरोपीची ओळख पटली आहे. पप्पू शिंदे, संतोष कनोजिया, निखिल यादव आणि नितेश पवार अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट! चौथ्या आरोपीची ओळख पटली, दोन महिलांची...
pradip purnekarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 01, 2026 | 4:08 PM
Share

ठाकरे गटाचे ठाण्यातील विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या झाल्यानंतर ठाण्यातील शिवसैनिक आक्रमक झाल आहेत. आरोपींना अटक करण्याची आणि त्यांना फाशी देण्याची मागणी शिवसैनिकांकडून होत आहे. त्यामुळे ठाण्यातील वातावरण तापलं असून पोलिसांवरही दबाव वाढला आहे. पोलिसांनीही या हत्येची गंभीर दखल घेत आरोपींना पकडण्यास सुरुवात केली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी एकूण नऊ पथके तयार केली होती. पोलिसाना या प्रकरणात आज मोठं यश आलं आहे. पोलिसांना चौथ्या आरोपीची ओळखही पटली आहे. मात्र, पाचव्या आरोपीने हेल्मेट घातले असल्याने त्याची ओळख पटण्यात अडचणी येत आहेत.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीची ओळख पटली असून नितेश पवार असे या चौथ्या आरोपीचे नाव आहे. या हत्याप्रकरणात एकूण पाच आरोपी सहभागी होते. त्यातल्या एका आरोपीची ओळख पटणे अद्याप बाकी आहे. हत्या करताना हेलमेट घातल्याने पाचव्या आरोपीची ओळख अद्याप पटलेली नाही. पप्पू शिंदे, संतोष कनोजिया उर्फ टल्ली, निखिल यादव आणि नितेश पवार अशी आतापर्यंत ओळख पटलेल्या आरोपींची नावे आहेत.

भाच्याच्या गाडीचा वापर

पप्पू शिंदे अटकेत असून अद्याप बाकीचे आरोपी फरार आहेत. आरोपी नितेश पवारने गुन्ह्यात भाच्याची गाडी वापरल्याचं तपासात समोर आलं आहे. सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून पोलीस त्यांची आणखी माहिती घेत आहेत.

दोन महिलांची चौकशी

पोलिसांनी काल 2 महिला आणि 2 पुरुषांना ताब्यात घेतलं होतं. ठाणे युनिट पाच येथे या चारही जणांची कसून चौकशी सुरू आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन महिलांची महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. या चौघांचा पूर्णेकर हत्याकांडात काय रोल आहे? याची माहिती पोलीस घेत आहेत.

मीरार रोडमधून 5 जण ताब्यात

दरम्यान मीरा रोड येथून काही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीरा रोडमधून 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. करिष्मा संतोष कनोजिया, रेणू अच्छेलाल मौर्य, सुनील कुसंता कनोजिया, रोशन रामबोध कैरी असं या पाचही संशयित आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण मानपाडा आणि मनोरमा नगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली असून तपासात अनेक गोष्टी निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. इतर आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे. आतापर्यंत संतोष मेहिलाल कनोजिया याला पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित बातमी वाचण्यासाठी क्लिक करा –

XXत एवढी चरबी का आलीय? तो… राऊतांकडून मिनाक्षी शिंदेंची कथित क्लिप पोस्ट

Follow Us
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...