ठाण्यात छमछम बंद, 15 लेडीजबार सील; महापालिकेची मोठी कारवाई

| Updated on: Jul 20, 2021 | 6:13 PM

कोरोना नियामांचं उल्लंघन करत बार चालवणाऱ्या 15 लेडीजबारवर महापालिकेने सील केले आहेत. महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. (bar and restaurant)

ठाण्यात छमछम बंद, 15 लेडीजबार सील; महापालिकेची मोठी कारवाई
bar and restaurant
Follow us on

ठाणे: कोरोना नियामांचं उल्लंघन करत बार चालवणाऱ्या 15 लेडीजबारवर महापालिकेने सील केले आहेत. महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अशीच कारवाई सुरू ठेवण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मात्र, पालिकेच्या या कारवाईमुळे ठाण्यातील इतर बारमालकांचे मात्रं चांगलेच धाब दणाणले आहेत. (Thane: TMC seals 15 ladies bars for violating social distancing, mask rules)

सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायजर वापर तसेच इतर साथरोग नियंत्रण अधिनियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करत एकूण 15 लेडीजबारवर सील केले. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक असल्याचं पालिकेकडून वारंवार सांगण्यात आलं आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांना तात्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती निहाय महापालिकेच्या पथकाद्वारे धाडी टाकून कारवाई करण्यात येत आहे.

15 बार सील

साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम 1897 तसेच आपत्ती व्यवस्था कायदा 2005 च्या साथरोग सर्व संबंधित तरतुदीनुसार शासनाने कोरोना संसर्ग रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या त्रिसूत्रीचे पालन करणे, सर्व बार अँण्ड रेस्टॉरंट, लेडिज बार व इतरांना बंधनकारकर करण्यात आलं आहे. सोमवार ते शुक्रवार 50 टक्के बैठक क्षमतेने सायं 4 वाजेपर्यंत बार, रेस्टॉरंट सुरू ठेवण्याचे तसेच सायंकाळी 4 नंतर व शनिवार आणि रविवार फक्त टेक अवे, पार्सल सुविधा व होम डिलिव्हरी सेवा सुरू ठेवण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन केलेल्या 15 आस्थापना महापालिकेने आज सील केल्या.

हे बार सील केले

या कारवाईतंर्गत ठाण्यातील तलावपाळी येथील आम्रपाली बार, तीन पेट्रोल पंप येथील अ‍ॅन्टीक पॅलेस बार, उपवन येथील नटराज बार, सिनेवंडर येथील आयकॉन बार, कापुरबावडी येथील स्वागत बार, नळपाडा येथील नक्षत्र बार, पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील के-नाईट बार, ओवळा नाका येथील स्टरलिंग बार, मॉडेला नाका येथील अ‍ॅन्जेल बार, उपवन येथील सुर संगम बार, भाईंदरपाडा येथील खुशी आणि मैफील बार, वागळे इस्टेटमधील सिझर पार्क बार, नौपाड्यातील मनिष बार आणि कापूरबावडी येथील सनसिटी बार असे एकूण 15 लेडीजबार सील करण्यात आले आहेत. सदरच्या सर्व कारवाया अतिक्रमण व निष्कासन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर, प्रणाली घोंगे, शंकर पाटोळे आणि विजयकुमार जाधव यांनी यांनी महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केल्या. (Thane: TMC seals 15 ladies bars for violating social distancing, mask rules)

 

संबंधित बातम्या:

आधी राहुल गांधींची भेट, मग नाना पटोलेंची दिल्लीत मोठी घोषणा, महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी शड्डू ठोकला

Maharashtra Coronavirus LIVE Update : बुलडाणा जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, जिल्ह्यात फक्त 16 रुग्णावर उपचार सुरु

Maharashtra News LIVE Update | मुंबई महापालिकेसह स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार : नाना पटोले 

(Thane: TMC seals 15 ladies bars for violating social distancing, mask rules)