उद्धव ठाकरेंच्या तोंडी हे शब्द शोभत नाहीत, शहाजी बापू पाटील यांनी सुनावलं

सत्ता गेल्यानं हे हादरले. यामुळं बडबड करत आहेत.

उद्धव ठाकरेंच्या तोंडी हे शब्द शोभत नाहीत, शहाजी बापू पाटील यांनी सुनावलं
शहाजी बापू पाटील यांनी नावचं सांगितली
Image Credit source: t v 9
गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Oct 02, 2022 | 2:36 PM

गणेश थोरात, Tv9 मराठी, प्रतिनिधी, ठाणे : शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले, विमानाचं रिझर्वेशन कसं करायचं हे मला माहिती आहे. रेल्वेचा रिझर्वेशन कसं करायचं मला माहिती आहे. हिमालयाची गुहा कशी रिझर्व्ह करायची हे आम्हाला अजून कळलेली नाही. तिकडे दिल्लीला जाऊन एक गुहा त्यांच्यासाठी ठेवायचे आहे. एका वर्षाने तुम्हाला चंद्रकांत खैरे यांना भेटायला हिमालयाच्या गुहेत जावं लागेल, अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली. अरविंद सावंत, विनायक राऊत आणि संजय राऊत यांनी सगळं शिवसेनेचं वाटोळं केलं. बाप चोरलं अशी टीका मुख्यमंत्री पदी राहिलेल्या माणसाच्या तोंडी शोभून दिसते काय, असा सवालही त्यांनी विचारला.

यांची अॅडमिशन पहिल्या वर्गात करावी लागेल

बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावून रिपाई रामदास आठवले, वंचित आघाडी बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडं आहे. कवाडे यांची संघटना आहे. इथं आम्ही तोच विचार घेऊन चाललोय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली.

सत्ता गेल्यानं हे हादरले. यामुळं बडबड करत आहेत. मग काय बोलावं काही सुचेना. म्हणून विकत गेले. खोके अशी काहीतरी टीका करतात. यांची अॅडमीशन पहिल्या वर्गात करावी लागेल. राजकारणाचा यांना काही अनुभव नाही.

सुरेश नवले खोटे कसे?

माजी मंत्री सुरेश नवले यांच्याबाबात पाटील म्हणाले, 95-96 ला मी काँग्रेसचा आमदार होतो. त्यामुळे मी विरोधी बाकावर बसलो होतो. पलीकडे सत्ताधारी युतीत काय चाललं होतं हे मला माहिती नाही. पण कदाचित एवढी शक्यता आहे की, आता त्यांनी मुख्यमंत्रीपद नाकारलं नाही. जर त्यांनी मुख्यमंत्री पद नाकारला असतं तर म्हणता आलास तर नवले खोटे.

नुसते पवार साहेब बोलले. त्यांनी तातडीने मुख्यमंत्रीपद स्वीकारलं. याचा अर्थ त्यांना त्यावेळेस मुख्यमंत्री व्हायचं होतं. पण कदाचित हिंदुह्रदय सम्राट यांना त्यांच्या घरात सत्ता नको होती, म्हणून ते घडलं असेल, असा टोलाही पाटील यांनी लगावला.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें