Murbad : मुरबाडमध्ये बोगस डॉक्टरांवर धाडसत्र सुरूच, आणखी दोन ‘देव माणूस’ पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Feb 02, 2022 | 12:37 AM

मुरबाड तालुक्यातील धसई प्राथमिक आरोग्य केंद्रातून चार वर्षांपूर्वी रिटायर झालेला शिपाई पांडुरंग घोलप यानं रिटायरमेंटनंतर धसईत दवाखाना टाकला होता. या मुन्नाभाईच्या चुकीच्या उपचारांमुळे धसईतील पाच आदिवासींचा मृत्यू झाला होता. यानंतर पांडुरंग घोलपवर गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.

Murbad : मुरबाडमध्ये बोगस डॉक्टरांवर धाडसत्र सुरूच, आणखी दोन देव माणूस पोलिसांच्या ताब्यात
Follow us on

मुरबाड : कंपाउंडरने चुकीचं इंजेक्शन दिल्यानं पाच आदिवासींचे बळी गेल्यानंतर आता मुरबाडचे आरोग्य विभाग(Murbad Health Department) खडबडून जागे झाल्याचं पाहायला मिळतंय. मुरबाडच्या आरोग्य विभागाने आता बोगस डॉक्टरां(Bogus Doctor)वर धाडसत्र सुरू केलंय. या कारवाईमध्ये दोन बोगस डॉक्टरांवर शनिवारी कारवाई करण्यात आली आहे. या डॉक्टरांचे दवाखानेही सील करण्यात आले असून त्यांना टोकावडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. विठ्ठल बुरबुडा आणि प्रमोद धनगर अशी अटक करण्यात आलेल्या दोन बोगस डॉक्टरांची नावे आहेत. ग्रामीण भागातील अडाणी गावकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत हे भामटे गावकऱ्यांसाठी ‘देव माणूस’ बनून त्यांच्या आरोग्याशी खेळ खेळत होते. मात्र आता अशा सर्व बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. (Two bogus doctors arrested in Murbad, clinic also sealed)

चुकीच्या इंजेक्शनमुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याने बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा

मुरबाड तालुक्यातील धसई प्राथमिक आरोग्य केंद्रातून चार वर्षांपूर्वी रिटायर झालेला शिपाई पांडुरंग घोलप यानं रिटायरमेंटनंतर धसईत दवाखाना टाकला होता. या मुन्नाभाईच्या चुकीच्या उपचारांमुळे धसईतील पाच आदिवासींचा मृत्यू झाला होता. यानंतर पांडुरंग घोलपवर गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुरबाड आरोग्य विभागाला खडबडून जाग आली. त्यानंतर मुरबाड तालुक्यातील डॉक्टरांची झाडाझडती आरोग्य विभागानं सुरू केली आहे. या कारवाईत शनिवारी आरोग्य विभागाने टोकावडे येथील बोगस डॉक्टर विठ्ठल बुरबुडा आणि मोरोशी येथील बोगस डॉक्टर येथील प्रमोद धनगर या दोघांवर कारवाई करण्यात आली. दोघांनाही टोकावडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. तर उमरोली इथला एक एक बंद दवाखाना सील केला आहे. या कारवाईमुळे बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले असून त्यांनी आपली दुकानं बंद करून पळ काढायला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात ग्रामस्थांच्या अज्ञानाचा फायदा घेत असे अनेक मुन्नाभाई बिनधास्तपणे डॉक्टर बनून आपली दुकानं चालवतायत. या सगळ्यांवर आता कठोर कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

वसईत बोगस डॉक्टरनंतर बोगस शिक्षिकेवर कारवाई

बोगस डॉक्टरचे प्रकरण वसईत ताजेच असताना वसईतील होलिक्रॉस हायस्कूल शाळेतील शिक्षिकाही बोगस असल्याचे शनिवारी उघड झाले आहे. याबाबत बोगस शिक्षिके विरोधात वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिला अटक केले आहे. या शिक्षिकेने बीएडचे डिग्री प्रमाणपत्र बोगस घेऊन तब्बल 20 वर्षे नोकरी केली. शाळा व्यवस्थापनाला याची माहिती मिळाल्यावर बोगस शिक्षिके विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मारिया राजन डायस उर्फ बाप्तिस्ता मारिया जॉन असे बोगस शिक्षिकेचे नाव असून ती वसईच्या रायतोवाडी येथील रहिवासी आहे. या शिक्षिकेने मुंबई विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे बनावट बीएड पदवी प्रमाणपत्र मिळवले. यानंतर मागील 20 वर्षांपासून वसईच्या निर्मळ येथील होलिक्रॉस हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करून, महाराष्ट्र सरकार व शाळेची फसवणूक केली आहे. ही घटना उघड झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक फादर मायकल जोसेफ तुस्कनो यांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (Two bogus doctors arrested in Murbad, clinic also sealed)

इतर बातम्या

Bhiwandi Crime : भिवंडीत स्फोटकांसह तिघांना गुन्हे शाखेने घेतले ताब्यात, आरोपींकडून जिलेटीन व डीटोनेटर हस्तगत

अल्पवयीन मुले मौजमजेसाठी चोरायचे बाईक, ‘असे’ अडकले पोलिसांच्या जाळ्यात, सात गाड्या चोरल्याची कबुली