AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ulhasnagar Crime : प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रेयसीला फिरवण्यासाठी दुचाकी चोरी, उल्हासनगरात चोरट्या प्रेमवीराला बेड्या

उल्हासनगर शहरात गेल्या काही दिवसात दुचाकी चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. याच अनुषंगाने पोलिसांनी या चोरट्यांविरोधात कडक पावले उचलली आहेत. दुचाकी चोरट्यांचा शोध घेत असताना एका चोरट्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार शोध मोहिम राबवत पोलिसांनी या चोरट्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Ulhasnagar Crime : प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रेयसीला फिरवण्यासाठी दुचाकी चोरी, उल्हासनगरात चोरट्या प्रेमवीराला बेड्या
प्रेयसीला फिरवण्यासाठी दुचाकी चोरी, उल्हासनगरात चोरट्या प्रेमवीराला बेड्या Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 08, 2022 | 8:37 PM
Share

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये प्रेयसीला फिरवण्यासाठी दुचाकी चोरी (Theft) करणाऱ्या एका प्रेमवीराला विठ्ठलवाडी पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. विठ्ठलवाडी पोलिसांनी ही कारवाई करत चोरीला गेलेल्या 3 दुचाकी आरोपीकडून हस्तगत केल्या आहेत. उल्हासनगरातील वाढत्या चोरीच्या घटनांचा तपास करत असताना पोलिसांना या चोराची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या प्रेमवेड्या चोराच्या मुसक्या आवळल्या. हा चोरटा नुकताच 18 वर्षांचा झाला आहे. त्याच्यावर अल्पवयीन असतानाचेही काही गुन्हे दाखल आहेत. या चोरट्याला अटक करुन प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली. (Ulhasnagar police arrested a thief for stealing a bike for his girlfriend)

आरोपीकडून चोरीच्या तीन गाड्या हस्तगत

उल्हासनगर शहरात गेल्या काही दिवसात दुचाकी चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. याच अनुषंगाने पोलिसांनी या चोरट्यांविरोधात कडक पावले उचलली आहेत. दुचाकी चोरट्यांचा शोध घेत असताना एका चोरट्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार शोध मोहिम राबवत पोलिसांनी या चोरट्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. प्रेयसीला फिरवण्यासाठी आरोपीने 3 गाड्या चोरल्याची कबुली पोलिस चौकशीत दिली. त्यानुसार त्याच्याकडून 2 अॅक्टिव्हा आणि 1 अॅक्सेस गाडी हस्तगत केली आहे. विशेष म्हणजे हा चोरटा नुकताच 18 वर्षांचा झाला असून त्याच्यावर अल्पवयीन असतानाचेही काही गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक करून प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. (Ulhasnagar police arrested a thief for stealing a bike for his girlfriend)

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.