VIDEO : उल्हासनगरात गर्लफ्रेंडवरून दोन गटात तुंबळ हाणामारी, भररस्त्यात फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ

Ulhasnagar crime: उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या भानू कोरी या तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती त्याला सोडून शाकिब खान नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती. याच कारणावरून भानू कोरी याने शाकिबला फोन करून सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय घेतला.

VIDEO : उल्हासनगरात गर्लफ्रेंडवरून दोन गटात तुंबळ हाणामारी, भररस्त्यात फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ
उल्हासनगरमधील राडा
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 19, 2022 | 7:16 AM

उल्हासनगर : उल्हासनगरात गर्लफ्रेंड कुणाची? यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी (Fighting) झाली. भररस्त्यात झालेल्या या फ्रीस्टाईल या हाणामारीचा व्हिडीओ (Video) समोर आला आहे. याप्रकरणात हिललाईन पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या हाणामारीत दोन्ही गटातले तरुण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात परस्परविरोधी मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी दिली आहे. (Video of a freestyle fight between two groups on girlfriends in Ulhasnagar)

प्रेमप्रकरणातून दोन गटात हाणामारी

उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या भानू कोरी या तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती त्याला सोडून शाकिब खान नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती. याच कारणावरून भानू कोरी याने शाकिबला फोन करून सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी 16 एप्रिल रोजी भानू हा त्याचे मित्र सोनू सोनकर आणि मुकेश यादव यांना घेऊन शाकिबला भेटण्यासाठी नेताजी चौक परिसरात गेला.

मात्र शाकिबला काहीतरी चुकीचं घडणार असल्याची कुणकुण लागल्यानं त्यानेही आधीच इज्राइल, शहाबाज आणि सलमान या त्याच्या तीन मित्रांना आधीच तिथे बोलावून घेतलं. तिथे गेल्यानंतर या दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ऐन वर्दळीच्या वेळी भररस्त्यात सुरू असलेली ही फ्रीस्टाईल हाणामारीची घटना मोबाईल कॅमेरातही चित्रित करण्यात आली. (Video of a freestyle fight between two groups on girlfriends in Ulhasnagar)

इतर बातम्या

Nagpur Murder : नागपूरमध्ये अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची अल्पवयीन मुलीच्या मदतीने हत्या

Nagpur Theft : सराफा व्यापाऱ्यावर हल्ला करुन लुटणारी टोळी जेरबंद, लुटलेला मुद्देमाल जप्त