AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Murder : नागपूरमध्ये अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची अल्पवयीन मुलीच्या मदतीने हत्या

पाच दिवसांपूर्वी मृतक धर्मेंद्र गजभिये चे त्याची पत्नी निशा सोबत कडाक्याचे भांडण झाले होते. त्यावेळी संतापलेल्या निशाने तिच्या अल्पवयीन मुलीच्या मदतीने धर्मेंद्रचा गळा आवळून हत्या केली. मात्र नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार निशाने पारडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र हे प्रकरण संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली.

Nagpur Murder : नागपूरमध्ये अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची अल्पवयीन मुलीच्या मदतीने हत्या
नागपूरमध्ये अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची अल्पवयीन मुलीच्या मदतीने हत्याImage Credit source: टीव्ही 9
| Edited By: | Updated on: Apr 19, 2022 | 12:26 AM
Share

नागपूर : अल्पवयीन मुलीच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या (Murder) करत आत्महत्या दर्शवण्याचा प्रयत्न केल्याची घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. मात्र पोलिसांनी पाच दिवस कसून तपास करत ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं सिद्ध करत पत्नीला अटक (Arrest) केली. नागपूरच्या पारडी पोलिस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली आहे. तर हत्येत मदक करणाऱ्या अल्पवयीन मुलीला सुधारगृहात पाठवले. धर्मेंद्र गडभिये असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. निशा गजभिये असे हत्या करणाऱ्या पत्नीचे नाव आहे. निशाचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध होते. यातूनच पत्नीने मुलीच्या मदतीने पतीचा काटा काढला. (In Nagpur wife murdered her husband with the help of her minor daughter)

अनैतिक संबंधातून पतीची हत्या

पाच दिवसांपूर्वी मृतक धर्मेंद्र गजभिये चे त्याची पत्नी निशा सोबत कडाक्याचे भांडण झाले होते. त्यावेळी संतापलेल्या निशाने तिच्या अल्पवयीन मुलीच्या मदतीने धर्मेंद्रचा गळा आवळून हत्या केली. मात्र नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार निशाने पारडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र हे प्रकरण संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर धर्मेंद्र याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचं स्पष्ट होताच पारडी पोलिसांनी निशाला अटक केली. तर तिच्या अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. निशाचा नवरा हा ट्रक ड्रायव्हर असल्याने तो सलग आठ/दहा दिवस बाहेर रहायचा. या दरम्यान निशाचे बाहेर सूत जुळले होते. याची कुणकुण धर्मेंद्रला लागल्याने त्यांच्यात नेहमी वाद व्हायला लागले होते. त्यातूनच निशाने मुलीच्या मदतीने स्वतःच्या नवऱ्याची हत्या केल्याचा खुलासा झाला आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. (In Nagpur wife murdered her husband with the help of her minor daughter)

इतर बातम्या

Nagpur Theft : सराफा व्यापाऱ्यावर हल्ला करुन लुटणारी टोळी जेरबंद, लुटलेला मुद्देमाल जप्त

Fraud : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 40 चीनी नागरिकांसह 150 जणांविरोधात एफआयआर दाखल

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.