Thane Accident : भरधाव दुचाकी मेट्रोच्या खांबावर आदळली, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

मीरा रोड येथील तरुण दुचाकी घेऊन घोडबंदर रोज मार्गे ठाण्याच्या दिशेने चालला होता. मात्र इच्छित स्थळी पोहचण्याआधीच तरुणावर काळाने घाला घातला.

Thane Accident : भरधाव दुचाकी मेट्रोच्या खांबावर आदळली, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
धुळ्यात बस अपघातात दोन ठार
| Updated on: Aug 28, 2023 | 5:15 PM

ठाणे / 28 ऑगस्ट 2023 : रस्ते अपघाताच्या घटनांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. ठाण्यातील मानपाडा रोडवर अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. भरधाव दुचाकी मेट्रोच्या खांबावर आदळल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच कापूरबावडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. मयत तरुण मीरा रोड येथील रहिवासी आहे. कापूरबावडी पोलीस अपघात प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

अपघातानंतर बाईकला आग

मयत 30 वर्षीय तरुण मीरा रोड येथील रहिवासी असून, तो घोडबंदर रोडवरुन बाईकने ठाण्याच्या दिशेने चालला होता. यावेळी मानपाडा रोडवर मेट्रो मार्गाच्या कामाच्या एका खांबावर त्याची बाईक आदळली. यामुळे तरुण खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बाईकला आग लागली आणि बाईक पूर्ण जळून खाक झाली.

गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा अंदाज

घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल आणि कापूरबावडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशमन दलाने तात्काळ आग विझवली. मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. अपघाताचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कापूरबावडी पोलीस अपघाताचा तपास करत आहेत. तपासाअंती अपघाताचे कारण स्पष्ट होईल.