मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिका बंद पडली, नाना पाटेकर, प्राजक्ता माळी कुठे आहेत? आव्हाडांचा सवाल; रोहित पवार आणि आव्हाडांकडून मदत जाहीर

'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका बंद पडत असल्यामुळे राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिका बंद पडली, नाना पाटेकर, प्राजक्ता माळी कुठे आहेत? आव्हाडांचा सवाल; रोहित पवार आणि आव्हाडांकडून मदत जाहीर
जितेंद्र आव्हाड
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 10, 2026 | 2:35 PM

सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ बंद पडल्याने राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत मालिकेला आर्थिक मदत जाहीर केली आहे. या मालिकेत अमोल कोल्हे आणि मधुराणी गोखले महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

रोहित पवार यांची ५० लाखांची मदत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या ‘सावित्रीबाई फुले’ मालिकेला पाठिंबा देत आपल्या कंपनीकडून ५० लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली. रोहित पवार म्हणाले, “मालिका म्हणजे विचार. तो टिकायला हवा. शरद पवार साहेब ६० वर्षांपासून या भूमीतल्या महामानवांच्या विचारांना मांडत आहेत. हे विचार मोठे आहेत. त्यासाठी संघर्ष करावा लागेल. शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, सावित्रीबाई फुले यांना संघर्ष करावा लागला. अमोल कोल्हे यांनी जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि आता अहिल्याबाई होळकर यांची मालिका आणण्याचे प्रयत्न केले, पण हे विचार पुढे येऊ नयेत म्हणून फंडिंग रोखले जात आहे.”

रोहित पवार यांनी अहिल्याबाई होळकर जयंती कार्यक्रमात झालेल्या गोंधळाचा उल्लेख करत सांगितले की, महापुरुषांना जाती-पातीत विभागू नका. ते पुढे म्हणाले, “पुढील १५ दिवसांत सामान्य घरातील पदाधिकाऱ्यांना पदे देणार आहोत. शेतकऱ्यांसाठी आम्ही अन्नत्याग आंदोलन करणार आहोत.”

जितेंद्र आव्हाड यांचा सवाल आणि १० लाखांची मदत

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी मालिका बंद पडल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी नाना पाटेकर, प्राजक्ता माळी आणि मकरंद अनासपुरे यांना थेट प्रश्न विचारला. आव्हाड म्हणाले, “सावित्रीबाई फुले मालिका बंद पडली. नेहमी भूमिका घेणारे नाना पाटेकर कुठे आहेत? अशा वेळी का बोलत नाहीत? प्राजक्ता माळी आणि मकरंद अनासपुरे यांनी बोलायला हवे. कुठे आहेत ते?”

आव्हाड यांनी अमोल कोल्हे यांच्या २०१७ च्या नथुराम गोडसे भूमिकेला आपण विरोध केल्याचे सांगितले. “शरद पवारांनी मला आडवले तरी मी ठाण्यात नाटक लागू दिले नाही. पण आज जोतिबा फुले यांची भूमिका साकारत असताना मालिका बंद पडली आहे. मी मालिकेला १० लाख रुपये मदत जाहीर करतो,” असे आव्हाड यांनी घोषित केले.

Follow Us