AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : प्रियांका चोप्राच्या एका क्लिकने वाढली अभिजीत दिपके यांची चर्चा; सोशल मीडियावर नेमकं काय घडलं ?

बॉलिवूडची 'देसी गर्ल' पुन्हा चर्चेत आली आहे, पण सध्या ती चित्रपटामुळे नव्हे तर इन्स्टाग्राम वर तिने एक पाऊल उचलल्यामुळे लाईमलाईटमध्ये आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) चाहते वाडत असून फॉलओर्सची संख्याही प्रचंड वाढली आहे, त्यातच आता या अभिनेत्रीच्या नावाचाही समावेश झाला आहे. तिने सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना फॉलो केलं असून , त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Abhijeet Dipke : प्रियांका चोप्राच्या एका क्लिकने वाढली अभिजीत दिपके यांची चर्चा; सोशल मीडियावर नेमकं काय घडलं ?
अभिजीत दीपके - प्रियांक चोप्रा
| Updated on: Jul 28, 2026 | 8:25 AM
Share

नीट परीक्षा पेपर फुटी, गैरव्यवहार या विरोधात आवाज उठवत कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) केलेलं आंदोलन सर्वत गाजला. फक्त देशातच नव्हे तर परदेशातही याची खूप चर्चा झाली. विद्यार्थी , आंदोलक त्यांच्या मागणीवर ठाम होते, सुमारे महिन्या-दीड महिन्याच्या लढाईनंतर या आंदोलनला यश मिळालं आणि शिक्षणमंत्री प्रधानांनी पदाचा राजीनामा दिला. अख्ख्या दशभरात गाजणाऱ्या या आंदोलनामागचा चेहरा, सीजेपीचा संस्थापक अभिजीत दिपकेही (Abhijeet Dipke) खूप चर्चेत आला. अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेले दीपके, आंदोलनसाठी स्वत: भारतात आले आणि सक्रीय सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या, आंजोलकांच्या मागण्या, त्यांचं आंदोलन यांना अनेक नेते, सेलिब्रिटी, राजकारणी यांनीही पाठिंबा दर्शवला. यामध्ये आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे.

याच घडामोडींदरम्यान, आता बॉलिवूडची जागतिक स्टार प्रियांका चोप्रा पुन्हा (Priyanka Chopra) एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र यावेळी कारण तिचा आगामी चित्रपट नसून, इंस्टाग्रामवर तिने उचललेलं एका पाऊल आहे. प्रियांकाने कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक आणि युवा कार्यकर्ते अभिजीत दिपके यांना फॉलो केल्याने सोशल मीडियावर विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. अलीकडच्या काळात कॉकरोच जनता पार्टी (CJP) ही संघटना कथित परीक्षा पेपर लीक प्रकरणे आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मागणीमुळे देशभर चर्चेत आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले. अशा परिस्थितीत प्रियांका चोप्राने त्यांना फॉलो केल्यामुळे या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

कोण आहेत अभिजीत दिपके ?

अभिजीत दिपके हे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आणि युवा कार्यकर्ते आहेत. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, पेपर लीक प्रकरणांवर कठोर कारवाई आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या मागण्यांसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना एकत्र आणत आंदोलन उभारलं. NEET पेपर लीक आणि परीक्षा प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या मुद्द्यावर देशभर विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडल्यानंतर त्यांचे नाव राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलं. त्यानंतर त्यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्येही मोठी वाढ झाली.

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनाला नवे वळण

दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनेक आठवडे सुरू असलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि पेपर लीक प्रकरणांवर कठोर कारवाईची मागणी केली. या आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके यांनी सातत्याने पत्रकार परिषद आणि सभांमधून आपली भूमिका मांडली. वाढत्या राजकीय आणि सार्वजनिक दबावाच्या पार्श्वभूमीवर 25 जुलै रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सादर केल्याचे वृत्त समोर आलं. त्यानंतर दिपके यांनी याला आंदोलनाचा पहिला मोठा विजय म्हणत, “ही केवळ सुरुवात आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.

प्रियांकाची प्रतिक्रिया चर्चेत

या संपूर्ण घडामोडींवर अभिनेत्री प्रियांका चोप्राने यापूर्वीही प्रतिक्रिया दिली होती. पत्रकार फे डिसूझा यांच्या शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यावरील सोशल मीडिया पोस्टवर तिने टाळ्या, जल्लोष आणि हार्टचे इमोजी शेअर केले होते. त्या प्रतिक्रियेनंतरही सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. आता प्रियांकाने अभिजीत दिपके यांना इंस्टाग्रामवर फॉलो केल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्याने या चर्चेला आणखी उधाण आलं आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा