भिवंडी सामूहिक अत्याचार प्रकरणात माजी आमदार नरेंद्र पवार यांना न्यायालयाचा मोठा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
मोठी बातमी समोर येत आहे. भिवंडी सामूहिक अत्याचार प्रकरणात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांना मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे. भिवंडी सामूहिक अत्याचार प्रकरणात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांना मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. भिवंडीतील बापगाव फार्महाऊस सामूहिक अत्याचार प्रकरणात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. 22 वर्षीय महिलेने केलेल्या कथित सामूहिक अत्याचाराच्या तक्रारीनंतर नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता नरेंद्र पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
दरम्यान या प्रकरणात भिवंडी न्यायालयात मागील सुनावणीत पीडित महिलेनं आणि पोलिसांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडली होती. गुन्ह्यात वापरलेली गाडी,फार्महाऊसमधील CCTV आणि DVR गायब असून, ते हस्तगत करण्यासाठी आरोपींची कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद यावेळी पोलिसांनी न्यायालयात केला होता. पोलीस आणि पीडिता यांचे म्हणणे ऐकल्यानंतर आज भिवंडी न्यायालयाने नरेंद्र पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे आता माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
आरोपी फरार
दरम्यान भिवंडी सामूहिक अत्याचार प्रकरणात भिवंडी न्यायालयाने भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे आता माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोप सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी आता विविध पथक तयार केले असून, या पथकांच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेली गाडी,फार्महाऊसमधील CCTV आणि DVR गायब असल्याचा दावा पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आला होता. न्यायालयाने पोलीस आणि पीडितेची बाजू ऐकून घेतल्यानंतर नरेंद्र पवार यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.