AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hingoli : मराठा समाजाच्या आरक्षणाकडे सरकारचे दुर्लक्ष, आता मूकमोर्चे नाहीतर ठोक मोर्चे..!

राज्यात शिंदे-फडवणीस सरकार अस्तित्वात आल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी मराठा समाजाची अपेक्षा आहे. त्याच भावनेतून मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहे. विशेषत: मराठवाड्यात सर्वाधिक संख्येने असणारा मराठा समाज हा शासकीय सेवासुविधा पासून कोसो दूर आहे.

Hingoli : मराठा समाजाच्या आरक्षणाकडे सरकारचे दुर्लक्ष, आता मूकमोर्चे नाहीतर ठोक मोर्चे..!
मराठा समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याने कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आला होता.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 20, 2022 | 10:55 PM
Share

हिंगोली : मराठा आरक्षणाचा मुद्दा रखडलेला आहे. याकडे ना (Maratha Community) मराठा समाजातील राजकीय नेत्यांचे लक्ष आहे ना (State Government) राज्य सरकारचे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत सुरू असलेल्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सकल मराठा समाजाच्या वतीने (Hingoli) कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आलाय.आजच्या बंदला अभूतपूर्व असा 100 टक्के प्रतिसाद मिळाला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्याच व्यापाऱ्यानी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवली या बंदमुळे आज रस्ते, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. शिवाय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाहीतर मात्र, आता मूक नव्हे तर ठोक मोर्चे काढले जाणार आहे.

12 दिवसांपासून उपोषण सुरु

दत्ता पाटील नावाचे कार्यकर्ते मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला आता 12 दिवस उलटले आहेत. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत आहे सरकार मात्र त्या कडे दूर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या उपोषणकर्त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील मराठा समाजाने आज बंदची हाक दिली. आतापर्यंत कार्यकर्त्याच्या उपोषणाकडे लक्ष देणे गरजेचे होते पण तसे झालेले नाही.

शिंदे सरकारकडून अपेक्षा वाढल्या

राज्यात शिंदे-फडवणीस सरकार अस्तित्वात आल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी मराठा समाजाची अपेक्षा आहे. त्याच भावनेतून मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहे. विशेषत: मराठवाड्यात सर्वाधिक संख्येने असणारा मराठा समाज हा शासकीय सेवासुविधा पासून कोसो दूर आहे.गरीब मराठा समाजाचे सगळे अस्तित्व हे शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र बदलत्या निसर्ग चक्रात शेतीचे उत्पन्न साथ देत नाहीये. त्यामुळे सरकारने आता तरी मराठा समाजाचे प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी हदगांव तालुक्यातील दत्ता पाटील हडसणीकर हे मुंबईतल्या आझाद मैदानात उपोषण करत आहेत.

उपोषणाकडे दुर्लक्ष

उपोषणाला आता बारा दिवस होत आले तरी त्यांच्या उपोषणाची अद्याप कुणीच दखल घेतलेली नाही. त्यामुळेच त्यांच्या उपोषणाकडे आणि मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज आखाडा बाळापूर येथे बंद पुकारण्यात आलाय.आखाडा बाळापूर येथील आजच्या बंदला अभूतपूर्व असा 100 टक्के प्रतिसाद मिळालाय, अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्याच व्यापाऱ्यानी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवली.

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.