Nashik | सती मातेचा यात्रा उत्सव कोरोनाचे नियम पाळून सुरू
संपूर्ण भारतभरातून बंजारा (Banjara)समाजाचे श्रद्धास्थान तसेच बोकडबळीमुळे प्रसिद्ध असणाऱ्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे यात्रा (Yatra) आहे. पाच दिवस चालणारा सती मातेचा यात्रा उत्सव कोरोनाचे नियम पाळून सुरू झाला आहे.
संपूर्ण भारतभरातून बंजारा (Banjara)समाजाचे श्रद्धास्थान तसेच बोकडबळीमुळे प्रसिद्ध असणाऱ्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे यात्रा (Yatra) आहे. पाच दिवस चालणारा सती मातेचा यात्रा उत्सव कोरोनाचे नियम पाळून सुरू झाला आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार माघी पौर्णिमेनिमित्त मोजक्या लोकांच्या उपस्थितीत यात्रा उत्सव सुरू झाला. सती मातेची पूजाअर्चा करण्यात आली. या यात्रा उत्सवाकरता महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश या भागातील बंजारा समाज मोठ्या उत्साहाने सहभागी झाला आहे. बोकडबळीसाठी यात्रा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. मात्र कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी साध्या पद्धतीने यात्रा उत्सव साजरा करण्यात येत आहे. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, सर्वांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे, असे साकडे भाविक देवीला घातल आहेत.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

