AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात 250 जातींच्या गुलाबांचं प्रदर्शन, प्रदर्शनाचं 105वं वर्ष | Pune Rose Exhibition |

पुण्यात 250 जातींच्या गुलाबांचं प्रदर्शन, प्रदर्शनाचं 105वं वर्ष | Pune Rose Exhibition |

| Updated on: Jan 31, 2022 | 3:30 PM
Share

पुण्यातील 'द रोझ सोसयटी'तर्फे पुण्या(Pune)त दरवर्षी या गुलाब प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं. यावर्षी या प्रदर्शनाचं 105वं वर्ष होतं. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस होता.

प्रत्येकाला फुलांचं आकर्षण असतं. म्हणूनच एखादं फूल (Flower) पाहिलं, की त्याचा वास घेतल्याशिवाय आपल्याला राहावत नाही. गुलाबा(Rose)चं खास आकर्षण अनेकांना आहे.. विविध प्रकारच्या गुलाबांना समारंभात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. काही ठिकाणी गुलाबाची शेतीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र एकाच ठिकाणी तुम्हाला 250 प्रकारचे गुलाब पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. पुण्यातील ‘द रोझ सोसयटी’तर्फे पुण्या(Pune)त दरवर्षी या गुलाब प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं. यावर्षी या प्रदर्शनाचं 105वं वर्ष होतं. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रदर्शनाचा काल शेवटचा दिवस होता. या गुलाब प्रदर्शनाचा पुणेकरांनी आनंद लुटला. विविध प्रजातींचे गुलाब यावेळी पाहायला मिळाले. मन मोहून टाकणारी अशी ही फुलं होती.

Published on: Jan 31, 2022 03:26 PM