मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा सस्पेन्स अखेर संपला; भुजबळांनी सांगितली आतली गोष्ट

दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठी विधान केलं आहे.

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा सस्पेन्स अखेर संपला; भुजबळांनी सांगितली आतली गोष्ट
Chhagan Bhujbal
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 13, 2026 | 9:27 PM

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याची चर्चा सुरू आहे.  तसा प्रस्ताव काँग्रेसने राष्ट्रवादी शरद पवार गटाला दिल्याचं देखील बोललं जात आहे. मात्र तसा कोणताही प्रस्ताव नाही, ही चर्चा कुठून आणि कशी सुरू झाली? याची कल्पना नाही, असं या विलीनीकरणाच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा फक्त मीडियात आहे, काही निर्णय घ्यायचा असल्यास दोन्ही पक्षांचे प्रमुख घेतील. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, ते आमचे संस्थापक अध्यक्ष देखील आहेत, असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ? 

विलीनीकरणाची जी चर्चा आहे, ती फक्त मीडियामध्ये आहे. जर काही असं होणार असेल तर आमच्या पक्षाच्या प्रमुख आणि त्यांचे पक्षाचे प्रमुख हे वेळ येईल तेव्हा विचार करतील. शरद पवार हे देशातील जुने जानते नेते आहेत. प्रत्यक्ष मोदी साहेब देखील त्यांना भेटतात, इतर लोक देखील त्यांचा मान-सन्मान करतात. ते आमचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आहेत, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांचं  विमान अपघातामध्ये निधन झालं. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली. अजित पवार यांच्या निधनापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा सुरू झाली होती, अशी देखील माहिती समोर आली आहे. मात्र अजून तरी ही केवळ चर्चाच सुरू असल्याचं दिसून येत आहे. यावर आता भुजबळांनी देखील प्रतिक्रिया देत या चर्चेला पूर्णविराम लावला आहे. विलीनीकरणाची चर्चा केवळ मीडियामध्ये असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Follow Us