AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neet Exam : ‘दादा आई-बाबांची काळजी घे’ अंकिताच्या शब्दांनी डोळ्यात पाणी आलं, नीटमुळे महाराष्ट्रात अजून एक जीवन संपलं

Neet Exam : अंकिताला अभ्यास करता यावा, यासाठी कुटुंबियांनी घरातच तिच्यासाठी वेगळी खोली बनवलेली. रविवारी संध्याकाळी ती तिच्या खोलीत अभ्यासासाठी गेली होती. बराचवेळ झाला तरी अंकिता बाहेर आली नाही.

Neet Exam : 'दादा आई-बाबांची काळजी घे' अंकिताच्या शब्दांनी डोळ्यात पाणी आलं, नीटमुळे महाराष्ट्रात अजून एक जीवन संपलं
neet student Ankita sangle end her life
| Updated on: Jul 27, 2026 | 10:21 AM
Share

महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जलालपूर गावातील एका 18 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपवलं. अंकिता सांगळे असं मृत मुलीचं नाव आहे. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, नीट परिक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे ती निराश होती. अंकिताच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आक्समिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे. अंकिताचं मेडिकलचं शिक्षण घेण्याचं स्वप्न होतं. नीट परीक्षेची ती दीर्घकाळापासून तयारी करत होती. अलीकडेच जाहीर झालेल्या निकालामध्ये तिला 166 गुण मिळाले होते. अंकिताला यापेक्षा जास्त गुणांची अपेक्षा होती. कमी गुण मिळाल्यामुळे ती तणावाखाली होती. याच मानसिक दबावामध्ये तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

अंकिताला अभ्यास करता यावा, यासाठी कुटुंबियांनी घरातच तिच्यासाठी वेगळी खोली बनवलेली. रविवारी संध्याकाळी ती तिच्या खोलीत अभ्यासासाठी गेली होती. बराचवेळ झाला तरी अंकिता बाहेर आली नाही. म्हणून कुटुंबियांनी दरवाजा उघडला. त्यावेळी आतलं दृष्य पाहून सगळेच हादरले. अंकिताने जीवन संपवून घेतलेलं. लगेचच पोलिसांना या बद्दल कळवण्यात आलं.

माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा

अंकिताने तिच्यामागे एक चिठ्ठी सोडली आहे. त्यात तिने लिहिलेलं की, “तुम्ही मला इतकं प्रेम दिलं. पण मी तुमची एकही इच्छा पूर्ण करु शकली नाही. आई तू तर प्रत्येक अडचणीत मैत्रीण बनून माझी साथ दिलीस. दादा तू सुद्धा मला साथ दिलीस. माझ्या जीवन संपवण्यासाठी तुम्ही जबाबदार नाहीत. तुम्ही मला जो आनंद दिला, तो मी कधीच विसरु शकत नाही” “दादा तू आई-बाबांची काळजी घे. त्यांना कुठल्या गोष्टीची कमतरता भासू देऊ नकोस. तू सुद्धा आनंदी राहा. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. मी तुम्हाला कुठला आनंद देऊ शकले नाही. मी आधी जेव्हा नीटचा अभ्यास करत होती, त्यावेळी तुम्ही त्याग केलात आणि मी काय केलं, तुमची इच्छा मी पूर्ण करु शकले नाही. आनंदी रहा. तुमची अंकिता” असं अंकिताने चिठ्ठीत लिहिलं आहे. तपास यंत्रणा सर्व बाजूंनी तपास करत आहे.

लंके यांनी या घटनेसाठी सरकारला जबाबदार धरलं

शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी अंकिताच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचं सांत्वन केलं. लंके यांनी या घटनेसाठी सरकारला जबाबदार धरलं आहे. नीट परीक्षेची संबंधित वाद आणि पेपर लीकची निष्पक्ष चौकशी वेळेत पूर्ण झाली असती तर कदाचित अशा घटना टळल्या असत्या असं निलेश लंके म्हणाले.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार