AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : तर खाकी पँट काढून हाफ चड्डी घाला अन् भाजपच्या कार्यालयासमोर उभं राहा; अभिजीत दीपकेंनी पोलिसांना सुनावलं

कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी थेट पोलिसांवर हल्ला चढवला आहे. पोलिसांना तरुणांनी केलेल्या रेकॉर्डिंगचा त्रास होण्याचं कारणच काय? एवढाच त्रास होत असेल तर पोलिसांनी तसं वागू नये. त्यांनी संविधान फॉलो करावे, असा टोलाच अभिजीत दीपके यांनी लगावला आहे.

Abhijeet Dipke : तर खाकी पँट काढून हाफ चड्डी घाला अन् भाजपच्या कार्यालयासमोर उभं राहा; अभिजीत दीपकेंनी पोलिसांना सुनावलं
अभिजीत दीपके
| Updated on: Jul 30, 2026 | 12:38 PM
Share

दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनात जेनजींकडून पोलिसांचं संभाषण, पोलिसांकडून झालेला हल्ला रेकॉर्ड करण्यात आला. त्यामुळे पोलीस उघडे पडले. जेनजीच्या या सतर्कतेमुळे पोलिसांनी आता एसओपी काढली आहे. भविष्यात आंदोलनावेळी रेकॉर्डिंग होण्याची भीती असल्याने त्यावेळी काय करायचं हे या एसओपीमध्ये नमूद केलं आहे. त्यावरून सीजेपीचे आंदोलक अभिजीत दीपके यांनी पोलिसांवर जोरदार हल्ला चढवला आहे. पोलिसांनी फक्त संविधानाचं पालन करावं. त्यांनी भाजपच्या ऑर्डर फॉलो करू नये. तसंच करायचं असेल तर खाकी पँट काढून हाफ चड्डी घालून भाजपच्या कार्यालयाबाहेर जाऊन उभं राहा, अशा शब्दात अभिजीत दीपकेंनी पोलिसांना सुनावले आहे.

अभिजीत दीपके यांनी मीडियाशी बोलताना संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलिसांच्या एसओपीवरून पोलिसांना धारेवर धरलं. मला वाटतं तुम्हाला रेकॉर्ड व्हायची भीती असेल तर तुम्ही अशा गोष्टी का करता? आम्ही आंदोलन केलं. कॅमेऱ्यासमोर केलं. मीडियासमोर केलं. पोलिसांना काही रेकॉर्ड होईल याची भीती वाटते याचा अर्थ पोलिसांच्या मनात काही ना काही भीती आहे. पोलिसांनी एसओपी करण्यापेक्षा संविधान फॉलो करावे. पोलिस एका पक्षाचे नाहीत. ते भाजपच्या व्हॉटसअप फॉरवर्डवर चालणारे नाहीत. ते संविधानावर चालणारे आहेत. त्यांनी संविधानावर चालावे. तुम्हाला भाजपची ऑर्डर फॉलो करायची असेल आणि देशाचं संविधान बाजूला ठेवायचं असेल तर खाकी पँट काढून हाफ चड्डी घाला आणि भाजपच्या हेड क्वॉर्टरसमोर उभं राहा आणि म्हणा मै भी चौकीदार, असं अभिजीत दीपके यांनी सुनावले.

पोलीस आणि भाजपच्या गुंडांचं प्लानिंग

19 जुलैच्या रात्री आणि 20 जुलैच्या सकाळी मी दगडाने भरलेले ट्रक पाहिले. मी व्हिडिओ काढले. पोलिसांना विचारलं. दगडाने भरलेले ट्रक दिल्लीत आले कसे काय? आमचा मार्च सुरू झालेला नव्हता. फुटलेली व्हॅन उभी केली होती. पोलिसांचा हा आाधीच प्लान होता. दगडफेकीचं प्लानिंग पोलिसांचं होतं. मला शंका आली. तेव्हा मी डीसीपींना भेटलो. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही शंका घेऊ नका. तिथे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी हा ट्रक आला आहे. आम्ही म्हणलो, आम्हाला येड्यात काढू नका. हा सगळा प्लान आहे, अशी माहिती दीपकेंनी दिली. पोलीस आणि भाजपच्या गुंडांचं हे प्लानिंग होतं. शेतकरी आंदोलन आणि सीएनआरसीतही हेच केलं आहे. जेव्हा जेव्हा आंदोलन होतं तेव्हा भाजप आणि दिल्ली पोलिसांचं ट्युनिंग कसं राहतं हे पाहिलं असेलच, असंही ते म्हणाले.

पवार, मोदी मोठे नेते

यावेळी त्यांनी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरही भाष्य केलं. शरद पवार आणि मोदी हे फार मोठे नेते आहेत. त्यामुळे ते भेटले असतील. पवार हे जंतरमंतरवर विचारपूस करायला आले होते, असं त्यांनी सांगितलं. तसेच भाजपवाले सध्या बरीच गणितं लावत आहेत. अशी गणित बरीच लागली. आधी चायनाचं लागलं. पाकिस्तानचं लागलं, आता हे लागतंय. अनिश माझा मित्र आहे. त्याच्या घरी नेहमी राहतो. दिल्लीत आल्यावर माझा मुक्काम अनिशच्याच घरी असतो, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा