Nashik| जिल्ह्यात 447 कोरोना रुग्ण; 340 तृतीयपंथीयांचे लसीकरण पूर्ण

| Updated on: Nov 19, 2021 | 5:59 PM

नाशिक विभागात एकूण 600 तृतीयपंथीयांची संख्या असून, त्यापैकी 340 तृतीयपंथीयांचे कोविड लसीकरण पूर्ण झाले आहे.

Nashik| जिल्ह्यात 447 कोरोना रुग्ण; 340 तृतीयपंथीयांचे लसीकरण पूर्ण
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः नाशिक जिल्ह्यात अजूनही 447 कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यात लसीकरणाने वेग पकडला आहे. त्यात 340 तृतीयपंथीयांचे लसीकरणही पूर्ण करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 2 हजार 632 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 698 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

यांच्यावर उपचार सुरू

जिल्ह्यात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 42, बागलाण 5, चांदवड 19, देवळा 6, दिंडोरी 6, इगतपुरी 5, कळवण 1, मालेगाव 3, नांदगाव 6, निफाड 77, सिन्नर 55, सुरगाणा 2, त्र्यंबकेश्वर 1, येवला 17 अशा एकूण 246 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 176, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 9 तर जिल्ह्याबाहेरील 17 रुग्ण असून, एकूण 448 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 11 हजार 778 रुग्ण आढळून आले आहेत.

सिन्नर, निफाडमध्ये रुग्ण जास्त

सध्या जिल्ह्यात लसीकरण वेगात सुरू आहे. ज्यांनी लसीकरण केले नाही, त्यांना रेशनपासून ते अनेक सुविधा नाकारण्यात आल्या आहेत. त्यामुळे लसीकरणाला वेग आला आहे. याचा परिणाम म्हणजे रुग्ण वाढण्याच्या प्रमाणात प्रचंड घट झाली आहे. विशेषतः दिवाळीनंतर रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. मात्र, अजूनही सिन्नर, निफाड या दोन तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या जास्तच आहे.

तृतीयपंथीयांचे लसीकरण पूर्ण

विभागीय स्तरावरील तृतीयपंथी कल्याण व त्यांच्या हक्काचे संरक्षण कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाच्या कामाचा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आढावा घेतला. त्यांनी तृतीयपंथी व्यक्तीच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करणे व त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. नाशिक विभागात एकूण 600 तृतीयपंथीयांची संख्या असून, त्यापैकी 340 तृतीयपंथीयांचे कोविड लसीकरण पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे विभागात 7 व्यक्तींना ओळख प्रमाणपत्र देण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

नाशिक जिल्ह्यात सध्या 447 कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यात लसीकरणाने वेग पकडला आहे. त्यात 340 तृतीयपंथीयांचे लसीकरणही पूर्ण करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 2 हजार 632 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
– डॉ. अनंत पवार, जिल्हा नोडल अधिकारी

इतर बातम्याः

Special Report| ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाचा धगधगता अंगारमळा; संघर्ष, क्रौर्य आणि सत्तेची पोळी!

Nashik| नाजुक देशा, कोमल देशा…5 लाख फुले, दीड लाख कुंड्या आणि तब्बल 9 एकरांवर साकारलंय देशातलं पहिलं फ्लॉवर पार्क!