AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon update : राज्यावर संकट! मॉन्सूनबाबत मोठी अपडेट, या तारखेला महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता..

Monsoon update : राज्यात मॉन्सून लांबणीवर पडताना दिसत आहे. यादरम्यानच धोक्याची घंटा पुढे येत आहे. अरबी समुद्रात मॉन्सूनची काहीच वाटचाल बघायला मिळत आहे. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे.

Monsoon update : राज्यावर संकट! मॉन्सूनबाबत मोठी अपडेट, या तारखेला महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता..
Monsoon update
| Updated on: Jun 16, 2026 | 11:32 AM
Share

15 जूनला राज्यात दाखल होणाऱ्या मॉन्सूनचा पत्ता नाही. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाकडून 20 जूनपर्यंत मुंबईसह राज्यात मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र, सध्याची स्थिती बघता राज्यात 29 जूनलाही मॉन्सून दाखल होण्याची शक्यता कमीच आहे. मॉन्सून सध्या स्थितीला अजूनही आहे, तशाच स्थितीत आहे. अफगाणिस्तानच्या दिशेने आलेल्या वाऱ्यामुळे मॉन्सूनला अडथळा निर्माण होत आहे. मॉन्सून अरबी समुद्रात असून पुढे सरकत नाही. हीच स्थिती जर पुढील 3 ते 4 दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याची मॉन्सूनची वाटचाल पाहत राज्यात मॉन्सून 20 जूनला देखील दाखल होण्याची शक्यता कमी आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला. एल निनो सक्रिय असल्याने स्थिती अधिक गंभीर आहे. राज्यातील मॉन्सूनवर या एल निनोचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. जगभरातील हवामान तज्ज्ञांनी याबाबत मोठा इशारा दिला.

राज्यात पेरण्या रखडल्या आहेत. शेतकऱ्यांनी पेरण्याची पूर्ण तयारी केली. मात्र, पाऊस काही येण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच मॉन्सून पूर्णपणे राज्यात दाखल होत नाही, तोपर्यंत पेरण्या न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले. मॉन्सूनची स्थिती पाहता यंदा पाणी टंचाईचे मोठे सावट आहे. शेतकरी चिंतेत आहेत. यासोबतच उष्णताही वाढताना दिसत आहे.

अनेक हवामान तज्ज्ञांकडून मोठे इशारे दिले जात आहेत. मात्र, प्रत्यक्षाच पाऊस काही पडण्याचे नाव घेत नाही. जर जून महिना जर कोरडा केला तर एक वेगळे मोठे संकट उभे राहू शकते. शेतीच्या पाण्याची समस्या आहे. मॉन्सून राज्यात उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामध्येच कोणत्याही परिस्थितीमध्ये 20 जूनला राज्यात मॉन्सून दाखल होणे आवश्यक आहे. जर मॉन्सून लांबणीवर पडला तर पेरणीचे संकट उभे राहून शकते.

सध्या अरबी समुद्रातील मॉन्सूनची स्थिती बघता 22 जूनपर्यंत राज्यात पाऊस येण्याच अंदाज काही हवामान तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. ही एक राज्याकरिता मोठी धोक्याची घंटा आहे. देशातील काही राज्यात मॉन्सून सक्रिय झाल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, राज्यात अजूनही मॉन्सूनच्या पावसाची प्रतिक्षा आहे.

Follow Us
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा