पुण्यातील कोर्टाबाहेर गोळीबार, कोयत्याने हल्ला; पालकमंत्री सुनेत्रा पवारांचा गुन्हेगारांना मोठा इशारा, म्हणाल्या…

कोर्ट परिसरातील हल्ल्यानंतर सुनेत्रा पवार आक्रमक! पुण्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाईपासून गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यापर्यंत महत्त्वाच्या सूचना, पुणेकरांच्या सुरक्षेवर नेमकं काय म्हणाल्या?

पुण्यातील कोर्टाबाहेर गोळीबार, कोयत्याने हल्ला; पालकमंत्री सुनेत्रा पवारांचा गुन्हेगारांना मोठा इशारा, म्हणाल्या...
Sunetra Pawar on pune crime
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 25, 2026 | 3:48 PM

पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरातील गोळीबाराच्या घटनेने सध्या एकच खळबळ उडाली आहे. कोर्टाच्या परिसरात जामिनावर बाहेर आलेल्या मंदार किवळे या गुन्हेगारावर टोळक्याने जीवघेणा हल्ला चढवला, आधी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला पण तो जखमी झालेला पाहून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये मंदार गंभीर जखमी झाला असून त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणावर आता राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केला जाणार नाही, असं सुनेत्रा पवारांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर घडलेली गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही.

Loading...

पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेला अधिक सतर्क आणि कठोर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष आणि गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यावर भर दिला जाईल. पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us