AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही तर RSS ची रेडिमेड स्क्रिप्ट… राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मंचावरून संघाचा अजेंडा? कराळे मास्तरांनी नवीन बॉम्ब फोडला

Nitesh Karale RSS- Rashtrasant Tukadoji Maharaj: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारमंचाचा वापर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार पेरण्यासाठी आणि एका विशिष्ट पक्षासाठी करण्यात आल्याचा गंभीर आरोप नितेश कराळे मास्तरांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली.

ही तर RSS ची रेडिमेड स्क्रिप्ट... राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मंचावरून संघाचा अजेंडा? कराळे मास्तरांनी नवीन बॉम्ब फोडला
ही तर RSS ची रेडिमेड स्क्रिप्ट... राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मंचावरून संघाचा अजेंडा? कराळे मास्तरांनी नवीन बॉम्ब फोडला
| Updated on: Nov 04, 2026 | 6:36 AM
Share

Nitesh Karale Facebook Post : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने घुसखोरी केल्याचा गंभीर आरोप नितेश कराळे मास्तरांनी केला. त्यांनी फेसबुकवर याविषयीची लांबलचक पोस्ट लिहिली. एका विशिष्ट पक्षाचा विचार रुजवण्यासाठी या विचारमंचाचा वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या आरोपांनी आता खळबळ उडाली आहे. नितेश कराळे यांनी नागपूर पदवीधरमध्ये मोठा खेला केला. ते डार्क हॉर्स ठरले. आता स्वतःच पक्ष काढण्याच्या तयारीत असलेल्या मास्तरांनी संघ परिवारावर गंभीर आरोप केला आहे.

नितेश कराळे यांची फेसबुक पोस्ट काय?

नितेश कराळे मास्तर यांनी फेसबुक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारमंचावरून संघाची रेडिमेट स्क्रीप्ट वाचण्यात आल्याचा दावा केला. “RSS ची रेडिमेट script दाखवली वाचून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचार मंचावरून? आम्ही लहानपणापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामुदायिक प्रार्थनेला जात होतो. आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहोत. दरवर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला जात असतो. पण मात्र काही दिवसांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार बाजूला सारून एका विशिष्ट पक्षाचे आणि RSS चे विचार राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त लाखो अनुयायासमोर पेरण्याचे काम केल्या जात आहे. असे दरवर्षी मला जाणवत होते. पण यावर्षी त्याचा उद्रेक झालेला दिसला. सामुदायिक प्रार्थनेमध्ये दरवर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या फोटोच्या बाजूला सर्व धर्माचे चिन्ह लावल्या जात होते ते सुद्धा मागच्या तीन वर्षापासून गायब आहेत. राष्ट्रसंतांनी सर्वधर्मसमभाव समाजात रुजवण्याचे काम केले. पण यावर्षीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळ्यामध्ये या देशातील युवक नीट च्या पेपर फुटीच्या विरोधात केलेल्या आंदोलनाला युवक या देशात अराजकता पसरवत आहे. असे म्हटले आहे. हे वाक्य मला अजिबात योग्य वाटले नाही. या देशामध्ये नीट चा पेपर फुटल्यामुळे 22 मुलांनी आत्महत्या केल्या. पेपर फुटी होऊ पुन्हा नये. आणि देशाचा भविष्य पुन्हा आत्महत्या करू नये म्हणून या विरोधात केलेला आंदोलन हे चूक आहे का? हा माझा प्रश्न आहे..?” असे कराळे मास्तरांनी प्रश्न उपस्थित केले.

राष्ट्रसंतांच्या विचारमंचाचा राजकीय वापर नको

त्याला अराजकता या शब्दाची जोड देणे हे योग्य आहे का ? राष्ट्रसंतांच्या या पुण्यतिथी महोत्सवामध्ये आतापर्यंत राष्ट्रसंतांचा जीवनप्रवास सांगितला जात होता. त्यांनी या देशाच्या स्वातंत्र चळवळीमध्ये ते योगदान दिलं ते सांगितले जात होते. पण ते न सांगता सध्याचे राजकीय मुद्दे समोर करून आणि धर्मनिरपेक्ष या शब्दाचा प्रचंड चुकीचा वापर दोन दिवसा अगोदर झालेल्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये सांगण्यात आला. माझा एवढाच म्हणणं आहे की राष्ट्र संतांचा मंच हा राजकीय मंच होऊ नये. तो काही ठराविक नेते, कोणत्याही पक्षाची हुजरेगिरी करणारा, आणि आरएसएस सारख्या संस्था मधून आलेल्या रेडिमेड स्क्रिप्ट मधून बहुजन सर्वसामान्य लोकांचे माथे भडकवणारे वक्तव्य या स्क्रिपमधून सांगण्यात येऊ नये, असे नितेश कराळे मास्तर म्हणाले.

जेन जींना टार्गेट का करता?

एवढाच आमचा उद्देश या पोस्टच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. माझ्या डोक्यात त्या दिवशीच हा विषय वारंवार खुपत होता . कारण दिल्लीच्या आंदोलनामध्ये मी स्वतः सहभागी होतो. मुलांना इतक्या अमानूष पणे मारलं तेव्हा या संस्थानांमधील एकाही व्यक्तींनी त्याच्या विरोधात वक्तव्य केलं नाही. आणि या दिल्लीतील Gen Z आंदोलनाला अराजकता शब्द देऊन राष्ट्रसंतांनी इंग्रजांविरुद्ध केलेल्या आंदोलनाला मूठ माती देण्याचं काम इथे करण्यात आलं. त्यामुळे अनेक लोकांचा मन व्यथित झाले आहे. याच पुण्यतिथी महोत्सवात देशाने अजून कशी प्रगती करायला पाहिजे ? आणि आतापर्यंत स्वातंत्र्यापासून कशी प्रगती केली हे जर यामध्ये सांगितलं तर अधिक योग्य होईल. राजकीय गोष्टी सांगायच्या असल्यास सरकार कोणाचेही येवो.सरकारचं चुकत असेल तर ते उघड पाडण्याचं काम राष्ट्रसंतांनी जसं इंग्रजा विरुद्ध केलं तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचार मंचावरून सरकारला उघडे पाडण्याचे काम या विचार मंचाने करावी एवढीच अपेक्षा करतो, असे कराळे मास्तरांनी या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले