सासरच्या छळाला कंटाळून तरुणाने संपवलं जीवन, शेटवचा व्हिडीओ समोर येताच माजली खळबळ
नवरा - बायकोचं भांडण कायम होत असतं... पण या एका तरुणाने सासरच्या जाचाला कंटाळून स्वतःचं जीवन संपवलं आहे... तरुणाचा शेवटचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे...

सासरच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने स्वतःचं जीवन संपवलं आहे. ज्यामुळे परिसरात सर्वत्र खळबळ माजली आहे. तर तरुणाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे, तरुणाने मृत्यूच्या पूर्वी व्हिडीओ बनवला आणि अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशी सुरु केली असून 4 जणांना अटक केली आहे. सध्या सर्वत्र प्रकरणाची चर्चा सुरु आहे.
सासरच्या जाताला कंटाळून तरुणाने संपवलं जीवन
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्हातल्या पारसमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने बायकोसह सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आणि स्वतःचं जीवन संपवलं आहे. बायकोसह सासरच्या मंडळींना मारहाण केल्याचे आरोप तरुणाने मृत्यूपूर्वी केले आहेत. संबंधित तरुणाचं नाव संघपाल खंडारे असं आहे. सासरच्या जाचाला कंटाळून संघपाल खंडारे याने आत्महत्या केली आहे. ज्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
संघपाल खंडारे याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो रिक्षाचालक होता आणि बाळापूर तालूक्यातील पारसचा रहिवाशी होता. संघपाल याने मृत्यूपूर्वी व्हिडीओ बनवला आणि तो शेवटा व्हिडीओ सर्व नातेवाईकांना पाठवला… सासरच्या लोकांपासून मला त्रास होत आहे… असे आरोप करत संघपाल याने रेल्वेसमोर उडी मारून स्वतःला संपवलं आहे.
संघपाल व्हिडीओमध्ये काय म्हणाला होता?
शेवटचा व्हिडीओ बनवत संघपाल म्हणाला, ‘सासरच्या 6 – 7 लोकांकडून मला त्रास होत आहे. सासरच्या लोकांनी मला मारहाण केली आहे… सासरच्या लोकांपासून जीविताला धोका असल्याचे सांगत त्याने आयुष्य संपवल आहे…. एवढंच नाही तर, माझ्या मृत्यूला जबाबदार असलेल्या लोकांवर कठोर कारवाईची मागणी त्याने केली.
या प्रकरणात रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी संघपालच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या लोकांवर गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणी पोलिसांना आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. यामध्ये बायको, सासू, अशा 3 महिलांसह 1 पुरुषाचा देखील समावेश आहे… तर संघपालने व्हिडिओमध्ये त्याच्यावर झालेल्या छळाची आपबिती सांगितली…. आता याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. म्हणून याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
