Shivsena Name And Symbol Hearing : खरी शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टातील सुनावणी रंजक वळणावर, आज काय घडणार?

Shivsena Name And Symbol Hearing : शिवसेना पक्ष कोणाचा? यावर सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी रंजक वळणावर आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचे वकिल आपपाली बाजू मांडत आहेत.

Shivsena Name And Symbol Hearing : खरी शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टातील सुनावणी रंजक वळणावर, आज काय घडणार?
Uddhav-Shinde
| Updated on: Aug 06, 2026 | 9:56 AM

चार वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेचे आज दोन गट आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानुसार अधिकृत शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. दुसऱ्याबाजूला उद्धव ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी आता नियमित सुनावणी सुरु आहे. काल शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. दोन्ही पक्षांनी अधिकृत शिवसेना पक्ष आपलाच असल्याचा दावा केला होता. निवडणूक आयोगाने फक्त विधिमंडळ पक्ष संख्येच्या आधारावर निर्णय दिला. यावर कपिल सिब्बल यांनी कोर्टात बाजू मांडताना म्हटलं की, “विधीमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाचा भाग आहे. तो म्हणजे मूळ राजकीय पक्ष नाही, पक्षाची घटना योग्य आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगचा नाही”.

सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर सरन्यायाधीशांनी त्यांना काही प्रश्न विचारले. “११-अ हे कलम जानेवारी २०१३ मध्ये निवडणूक आयोगाला कळविण्यात आले होते का? तसेच या कागदपत्रावरील स्वाक्षरीची आपण पुष्टी करू शकता का?” असा सवाल न्यायालयाने विचारला.

युक्तिवादाला शिंदे गटाचे वकील प्रत्युत्तर देतील

आज दुपारी पुन्हा दोन वाजता या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल हेच यावेळी पुन्हा युक्तिवाद करणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आणखी एक वकील युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर शिंदे शिवसेनेच्या वतीने मेहता आणि कौल हे युक्तिवाद करतील, त्यानंतर याच्या संदर्भातील निर्णय होईल. कपिल सिब्बल यांनी आज जो काही युक्तिवाद केला, त्या युक्तिवादाला शिंदे गटाचे वकील प्रत्युत्तर देतील. कोर्टातून बाहेर पडताना संजय राऊत यांनी व्हिक्ट्री साईन दाखवलं यावर देखील यावेळी राहुल शेवाळे म्हणाले की,दावा कोणीही करेल, परंतु निर्णय देण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा आहे. आज सुप्रीम कोर्टात काय घडणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us