Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस खरचं उपपंतप्रधान होऊ शकतात का? नामवंत पत्रकाराचं विचार करायला भाग पाडणारं विश्लेषण

Devendra Fadnavis : खासदार संजय राऊत यांनी आज एक बॉम्ब फोडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपपंतप्रधान करण्याचा संघाचा आग्रह असल्याचा दावा राऊत यांनी केला. त्यावर महाराष्ट्रातल्या नामवंत पत्रकाराने विचार करायला भाग पाडणारं विश्लेषण केलं आहे.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस खरचं उपपंतप्रधान होऊ शकतात का? नामवंत पत्रकाराचं विचार करायला भाग पाडणारं विश्लेषण
Devendra Fadnavis
| Updated on: Sep 03, 2026 | 12:07 PM

उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत नियमित पत्रकार परिषद घेत असता. त्यांच्या टीकेचा रोख नेहमीच केंद्रातल्या मोदी सरकार आणि महाराष्ट्रात फडणवीस सरकारवर असतो. आज त्यांनी एक मोठा दावा केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपपंतप्रधान करण्याचा संघाचा आग्रह असल्याचा दावा राऊत यांनी केला. मागच्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. आता संजय राऊतांच्या या दाव्यावर ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी विचार करायला भाग पाडणारी प्रतिक्रिया दिली आहे.

“गेले काही दिवस आपण ऐकतोय देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार. त्यांना दिल्लीच्या राजकारणात घ्यायचं आहे. संजय राऊतांनी सांगितलं वरिष्ठ मंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगितलय, त्यात तथ्य आहे. वरिष्ठ मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान आणि आदिवासी विकास मंत्री जोएल ओराम या चार मंत्र्यांकडे राजीनामे मागितलेत. पण त्यांनी राजीनामा द्यायला नकार दिला आहे. ही दिल्लीच्या वर्तुळातली कन्फर्म बातमी आहे” असा दावा ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी केला.

मोदी सरकारशी संघाची असहमती का?

“राऊत जुनी बातमी देवेंद्र फडणवीसांच्या उपपंतप्रधानपदाची जोड देऊन सांगत आहेत. संघाने ज्या पद्धतीने भूमिका घेतली आहे, दिल्लीतल्या जंतर-मंतरच्या आंदोलनाकडे भाजपं सरकारने दुर्लक्ष केलं. त्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी विद्यार्थ्यांची मागणी योग्य असल्याचं सांगितलं. त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. एकप्रकारने संघाने केंद्र सरकारच्या भूमिकेशी असहमती दर्शवली. संघ आणि भाजपमध्ये आता सौहार्दाचे संबंध राहिलेले नाहीत” असा दावा विजय चोरमारे यांनी केला.

त्यांना आतल्या बातम्या माहित असतात

“मोदी-शाह जंतर-मंतरच्या आंदोलनामुळे थोडे वीक झाले आहेत. अशावेळी संघ पकड घेण्याचा प्रयत्न करत आहे. यात चूक काही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सध्याचा सगळ्यात महत्वाचा मोहरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. ते नागपूरचे आहेत. संघाच्या वर्तुळात त्यांचे सर्वांशी चांगले संबंध आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर त्यांनी आपलं कर्तुत्व सिद्ध केलं आहे. संजय राऊत दिल्लीच्या वर्तुळात असतात. त्यांना आतल्या बातम्या माहित असतात” असं विजय चोरमारे म्हणाले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us