AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालकाने घेतला जगाचा निरोप पण शेवटपर्यंत कुत्र्याने सोडली नाही साथ, हृदयस्पर्शी घटना किल्ले राजगडावर..

मालकाच्या निधनानंतरही पाळीव कुत्र्याने सोडली नाही साथ. पुण्यातील राजगड किल्ल्यावर जिज्ञेश सदाशिव खांडाळकर हे आपल्या पाळीव कुत्र्यासह शनिवारी गड पाहण्यासाठी आले होते. गडावर थकवा जाणवू लागल्याने जिज्ञेश बसले होते. मात्र, त्यावेळी मालकाने जगाचा निरोप घेतला. पण कुत्र्याने शेवटपर्यंत साथ सोडली नाही.

मालकाने घेतला जगाचा निरोप पण शेवटपर्यंत कुत्र्याने सोडली नाही साथ, हृदयस्पर्शी घटना किल्ले राजगडावर..
Rajgad
| Updated on: Oct 13, 2026 | 9:00 AM
Share

पुण्यातील राजगडावर मालकाच्या निधनानंतरही पाळीव कुत्र्याने सोडली नाही साथ. पुण्यातील राजगड किल्ल्यावर जिज्ञेश सदाशिव खांडाळकर हे आपल्या पाळीव कुत्र्यासह शनिवारी गड पाहण्यासाठी आले होते. गडावर थकवा जाणवू लागल्याने जिज्ञेश बसले होते. काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना गडावरून खाली आणण्यात येत असताना त्यांचा पाळीव कुत्रा सतत सोबत राहिला. आपल्या लाडक्या मालकाला काय झाले आहे, याची जाणीव नसली तरी त्याला सोडून जाण्याची कल्पनाही जणू त्या मुक्या जीवाला मान्य नव्हती. या कठीण प्रसंगातही त्यांच्या पाळीव कुत्र्याने अखेरपर्यंत त्यांची साथ सोडली नाही. या मुक्या जीवाची निष्ठा पाहून उपस्थित पर्यटकांचे मन हेलावून गेले.

माणूस आणि प्राणी यांच्यातील नातं हे शब्दांपलीकडचं असतं. विश्वास, प्रेम आणि निष्ठेने जोडलेलं हे नातं किती अतूट असतं, याची हृदयस्पर्शी प्रचिती शनिवारी किल्ले राजगडावर आली. गड पाहण्यासाठी आलेल्या जिज्ञेश सदाशिव खांडाळकर वय 30 यांचा हृदयविकाराच्या झटक्याने जीव गेला. मात्र, या कठीण प्रसंगातही त्यांच्या पाळीव कुत्र्याने अखेरपर्यंत त्यांची साथ सोडली नाही. या मुक्या जीवाची निष्ठा पाहून उपस्थित पर्यटकांचे मन हेलावून गेले.

गडावर थकवा जाणवू लागल्याने जिज्ञेश बसले होते. काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना गडावरून खाली आणण्यात येत असताना त्यांचा पाळीव कुत्रा सतत सोबत राहिला. आपल्या लाडक्या मालकाला काय झाले आहे, याची जाणीव नसली तरी त्याला सोडून जाण्याची कल्पनाही जणू त्या मुक्या जीवाला मान्य नव्हती.

राजगडावरील ही घटना एका पर्यटकाच्या मृत्यूची दुःखद बातमी असली, तरी ज्या मालकाने आयुष्यभर प्रेम दिले, त्याची साथ मृत्यूनंतरही या मुक्या जीवाने सोडली नाही. या निःशब्द निष्ठेने उपस्थित पर्यटकांचे मन हेलावून गेले. माणसांनाही न जमणारी निष्ठा एका मुक्या जीवाने आपल्या कृतीतून दाखवून दिली.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान