मुली नकार द्यायच्या, लग्नच जुळेना, प्रचंड नैराश्यातून दोन तरूणांनी… त्या घटनेने महाराष्ट्र हादरला
बुलढाणा जिल्ह्यात लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून पाच दिवसांत दोन तरुणांनी आत्महत्या केल्या. संग्रामपूर येथील हरीश वानखेडे आणि चिखलीतील सत्यपाल भिसे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. दारिद्र्य, बेरोजगारी आणि विवाहाच्या चिंतेने ग्रासलेल्या या युवकांच्या आत्महत्येमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनांमुळे सामाजिक चिंतेत भर पडली आहे.

लग्न करून संसार मांडावा, चांगलं आयुष्य जगावं असं प्रत्येक तरूण-तरूणीचं स्वप्न असतो. सुखी संसाराची सगळ्यांनाच आस असते. पण याच लग्नाच्या स्वप्नामुळे बुलढाण्यात दोन तरण्याताठा व्यक्तींनी नको ते पाऊल उचलत आपलं आयुष्यच संपवून टाकलं. लग्न जुळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यात पाच दिवसांत दोन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून यामुळे प्रचंड कलबळ माजली आहे. दोन तरूणांच्या जाण्यामुळे नागरिक हळहळत असून त्यांच्या कुटुंबियांवर तर दु:खाचा अक्षरश: डोंगरच कोसळला आहे. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे हरीश वानखेडे यांनी आयुष्य संपवलं तर चिखली तालुक्यात मंगरूळ येथे सत्यपाल भिसे यांनीही आत्महत्या केल्या. या हृद्यद्रावक घटनेमुळे सर्वच हळहळत आहेत.
सगळे कामावर गेल्यावर संपवलं आयुष्य
मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना ही बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या सोनाळा येथे घडली होती. लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून 28 वर्षाच्या तरूणाने आपल्याच राहत्या घरात गळफास घेऊन जीवन यात्रा संपवल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. हरिष वानखडे, असं तरूणाचे नाव आहे. त्याच्या घरातली सगळी माणसं ही कामाला बाहेर निघून गेल्यानंतर त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. हरिष हा भूमिहीन असून अत्यंत गरीब कुटुंबातील होता, अशी माहिती समोर आली आहे.
गेल्या 2 ते 3 वर्षांपासून बरीशचे वडीले हे त्याच्या लग्नासाठी एखादं स्थल, मुलगी शोधत होते. मात्र त्यांच्या घरच्या गरीब परिस्थितीमुळे हरीशला मुलगी द्यायला कोणीच तय़ार नव्हतं. खूप प्रयत्न करूनही लग्नासाठी मुलगी न मिळाल्याने,त्याच नैराशातून त्याने आत्महत्या केली, आयुष्य संपवलं. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे .
व्यसनाधीन होऊन झाडाला गळफास घेऊन संपवलं आयुष्य
तर अशीच दुसरी दुर्दैवी घटना घडली ती चिखली तालुक्यातील मंगरूळ येथे. तेथे राहणाऱ्या अवघ्या 25 वर्षांच्या सत्यपाल भिसे यावनेही आत्महत्या करत लाखमोलाचं आयुष्य संपवलं. त्यांचही लग्न बऱ्याच काळापासून ठरत नव्हतं, याच रागातून, नैराश्यातून त्याने व्यसनाधीन होऊन झाडाला फास लावून घेत आणि आपली जीवनयात्रा संपवली. सत्यपालच्या सोबत असलल्या सर्व मित्रांचं लग्न झालं होतं. पण त्याचंच लग्न ठरत नव्हतं. तसेच सत्यपालचं शिक्षण भरपूर झालं होतं, तरीही त्याला कुठेच नोकरी मिळत नवह्ती, ना त्याचं लग्न ठरत होतं. त्यामुळे त्याला दारूचे व्यसन सुद्धा लागले होते. या चनैराश्यातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचललं अशी माहिती समोर आली. दोन्ही प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आले असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.