AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Independence Day: स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करताना ‘या’ चुका अजिबात करू नका, काय आहेत नियम? जाणून घ्या एका क्लिकवर

Flag Code Of India: 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सकाळी ध्वजारोहण करण्यात येते. राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी भारतीय ध्वज संहितेनुसारच ध्वजारोहण आणि इतर प्रक्रिया करावी लागते. काय आहे याविषयीचे नियम?

Independence Day: स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करताना 'या' चुका अजिबात करू नका, काय आहेत नियम? जाणून घ्या एका क्लिकवर
स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करताना 'या' चुका अजिबात करू नकाImage Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 14, 2026 | 7:35 PM
Share

200 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. देशात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. अनेक शाळा, महाविद्यालये, सरकारी, निम शासकीय, खासगी कंपन्या, गृहनिर्माण सोसायट्या आणि प्रतिष्ठानावर तिरंगा डौलाने फडकतो. पण ध्वजारोहणाचे काही नियम आहे. राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी भारतीय ध्वज संहिता ठरलेली आहे. त्यानुसारच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यासाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. त्यानुसारच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

काय आहेत याविषयीचे नियम?

राष्ट्रीय ध्वज सन्मान आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी भारतीय ध्वज संहिता निश्चित आहे. त्या नियमानुसार, ध्वजारोहण आणि इतर प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

ध्वजारोहण करताना जाणून घ्या हे नियम

1. तिरंगा नेहमी कापडाचा असावा?

राष्ट्रीय ध्वज हा हाताने कातलेल्या आणि विणलेल्या अथवा मशीनद्वारे तयार केलेले असावा. कापूस, पॉलिस्टर, लोकर, रेशीम अथवा खादीपासून तो तयार केलेला असावा.

2. ध्वजारोहण कधी करावे?

सकाळी ध्वजारोहण करावे. दिवसभर राष्ट्रीय ध्वज फडकावतो येतो. पण याविषयीचे काही नियम आहेत.

3. घरावर तिरंगा फडकवता येतो?

नागरीक, खासगी संस्था आणि शैक्षणिक संस्था संपूर्ण दिवस राष्ट्रीय ध्वज फडकवू शकतात. घरावरही राष्ट्रध्वज फडकवता येतो. पण त्याचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपणे आवश्यक आहे. राष्ट्रीय ध्वज हा उंच ठिकाणी आणि स्पष्टपणे उठून दिसेल अशा स्थितीत तो असावा. ही काळजी घेणे आवश्यक आहे.

ध्वजारोहण करताना या चुका टाळाच

एकाच ठिकाणी अनेक ध्वजात राष्ट्रध्वज अजिबात फडकवू नका

ध्वजारोहण करताना जागा स्वच्छ करा. तो स्पष्टपणे उठून दिसेल अशा उंच ठिकाणी असावा

तिरंगा उलटा फडकणार नाही याची काळजी घ्या.

केशरी पट्टी नेहमी सर्वात वरच्या बाजूला तर हिरवी पट्टी खालील दिशेने असावी.

कोणत्याही व्यक्तीला सलामी देता यावी यासाठी तिरंगा खाली झुकवू नका, आणू नका.

तिरंगा जमिनीला, फरशीला आणि अथवा इतर वस्तूला घासत जाईल असे करू नका

फाटलेला, खराब आणि विस्कटलेला तिरंगा अजिबात फटकवू नये

तिरंग्यावर काहीही लिखाण नसावे. त्यावर डाग नसावेत याकडे कटाक्षाने लक्ष द्या

सजावटीसाठी, टेबलावर टाकण्यासाठी तिरंग्याचा अजिबात वापर होऊ नये

तिरंग्याचा वापर कपडे, गणवेश म्हणून बिलकूल, अजिबात करू नका

रुमाल, नॅपकिन, कुशन वा इतर कपड्यांवर तिरंग्याची छपाई करू नये

Follow Us
FDA मधील ‘लुटी’च्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण; संजय राऊत...
FDA मधील ‘लुटी’च्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण; संजय राऊतांना दिलं उत्तर
मतचोरीवर बोलणारा मी एकमेव सत्ताधारी; शिंदे गटातील नेता अचानक असं...
मतचोरीवर बोलणारा मी एकमेव सत्ताधारी; शिंदे गटातील नेता अचानक असं का म्हणाला?
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील...
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संध
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संधी; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन...
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन सहभागी होण्याचे आवाहन
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक...
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय...
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट...
Pune : बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट, अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
Water Level In Dams : पुढील 9 महिने पाण्याची चिंता वाढणार? राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
Sanjay Raut : इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे....