हबी… वाईफी… मुलांची आई, सिया-चेतनचे ते मेसेज… अनेक तरुणांशी… केतन अग्रवाल प्रकरणात मोठा खुलासा
केतन अग्रवाल प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सिया आणि चेतन हे एकमेकांना 'हबी-वाईफी' म्हणत असल्याच्या चॅट्स समोर आल्या आहेत. केतनच्या हत्येत सियाच्या कुटुंबाचाही सहभाग असल्याचा दावा विशाल अग्रवाल यांनी केला आहे. साक्षीदारांना धमकावण्यात आले असून, सियाचे अनेकांशी संबंध होते. ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी विशाल अग्रवाल यांनी केली आहे.

केतन अग्रवाल प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात फक्त सिया आणि चेतनच आरोपी नाहीयेत, तर त्यांना सियाच्या कुटुंबीयांनीही मदत केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच सिया आणि चेतनचे गोडीगुलाबीचे मेसेजही समोर आले आहेत. या मेसेजमध्ये दोघेही एकमेकांचा उल्लेख नवरा-बायको करत असल्याचं समोर आलं आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी हा धक्कादायक दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
विशाल अग्रवाल यांनी मीडियाशी संवाद साधताना या प्रकरणावर भाष्य केलं. तसेच चार्जशीटमध्ये काय काय आहे? याची माहितीही दिली. केतनच्या हत्येचा कट कधी रचला? कसा रचला? किती दिवसापासून रचला या सर्व गोष्टी या चार्जशीटमध्ये आहेत. या प्रकरणात अनेक साक्षीदार आहेत. तसेच या चार्जशीटमध्ये अनेक धक्कादायक माहिती असल्याचा दावा केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी केला आहे.
साक्षीदारांना जीवे मारण्याच्या धमक्या
केतनची हत्या केल्यानंतर घटनास्थळी असलेल्या साक्षीदारांना धमकावण्यात आलं होतं. त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सियाचे कुटुंबीय तिच्या पाठीशी होते. ते देखील या कटात सहभागी आहेत. सिया आणि चेतनच्या चॅटिंगमध्ये दोघे एकमेकांचा पती-पत्नी असा उल्लेख करत होते. दोघेही एकमेकांना हबी आणि वाईफी म्हणत होते. तू माझ्या मुलांची आई आहेस असंही चेतन सियाला म्हणत होता. मुलाची आई अस देखील संबोधित होते, असं विशाल अग्रवाल यांनी म्हटलं आहे.
सियाचे अनेकांशी रिलेशनशीप
सिया अनेक तरुणांसोबत रिलेशनशीपमध्ये होती. नेमके किती होते हे सांगू शकत नाही. पण अनेकजण असण्याची शक्यता आहे, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. तसेच ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
माझा मुलगा पुरुष होता म्हणून…
आपल्या देशात स्त्री पुरुष समानता आहे की नाही? असा प्रश्न आहे. माझ्या मुलाच्या जागी महिला असती तर तिला न्याय मिळाला असता. माझा मुलगा पुरुष आहे म्हणून न्याय मिळत नाही का? त्याच्यावर अन्याय झालेला आहे. सर्वांनी समोर येऊन त्याला न्याय मिळवून द्यावा ही विनंती, असं आवाहन त्यांनी केलं.
