IND vs NZ : हरलो सुद्धा आणि लाजिरवाण्या क्लबमध्ये पण एन्ट्री, रोहित-विराट सोबत 16 वर्षानंतर असं घडलं
IND vs NZ : आज चौथ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव झाला आहे. एकतर आपण ही मॅच हरलो तसच लाजिरवाण्या क्लबमध्ये पण एन्ट्री झाली. रोहित-विराट सोबत 16 वर्षानंतर असं घडलं

IND vs NZ 4th ODI : न्यूझीलंड विरुद्ध बे ओवल मैदानावर आज चौथा वनडे सामना झाला. या सामन्यात 334 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाची खूप खराब सुरुवात झाली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेनरीन इनिंगच्या पहिल्याच ओव्हरमध्ये टीम इंडियाला हादरे दिले. भारतीय क्रिकेट संघाचे स्तंभ रोहित शर्मा, विराट कोहली आणि कॅप्टन श्रेयस अय्यर यांना पॅवेलियनमध्ये पाठवलं. स्कोर बोर्डवर शून्य धावा असताना भारताच्या तीन विकेट गेलेल्या. या सोबतच भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एका खराब अध्यायाची नोंद झाली आहे.
मॅट हेनरीने आपल्या स्विंग आणि सीम गोलंदाजीने भारताच्या टॉप ऑर्डरला सावरण्याची संधीच दिली नाही. ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर हेनरीच्या उसळी घेणाऱ्या चेंडूने रोहित शर्माला चकवलं. चेंडू बॅटची कड घेऊन स्लीप मध्ये उभ्या असलेल्या एलेनच्या हातात विसावला. रोहितच्या नंतर विराट कोहलीचा आत येणारा हेनरीचा चेंडू समजू शकला नाही. चेंडू बॅटिला लागून स्टम्पवर आदळला.
बॉल ट्रॅकिंगमध्ये थ्री रेड्स दिसले
त्यानंतर ओव्हरमधला हेनरीचा आत येणारा शेवटचा चेंडू कॅप्टन श्रेयस अय्यरच्या पॅडवर लागला. अंपायर कुमार धर्मसेनाने अपील फेटाळून लावलं. न्यूझीलंडने रिव्यू घेतल्यानंतर बॉल ट्रॅकिंगमध्ये थ्री रेड्स दिसले. अय्यरला खातं न उघडताच तंबूत परतला. भारताने पहिल्याच ओव्हरमध्ये खातं न उघडताच तीन विकेट गमावल्या.पुरुष वनडे क्रिकेटच्या इतिहासात भारत चौथी अशी टीम बनला आहे, ज्यांनी खातं उघडण्याआधीच तीन विकेट गमावले.
रोहितचं हे पहिलं गोल्डन डक
या मॅचमध्ये शून्यावर आऊट होण्यासह भारतीय दिग्गजांच्या करिअरमध्ये अनेक नको असलेल्या रेकॉर्ड्सची नोंद झाली आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघे एकाच मॅचमध्ये शुन्यावर आऊट झालेत. याआधी 2010 साली दांबुलात श्रीलंकेविरुद्ध दोन्ही दिग्गज खातं न उघडताच बाद झाले होते. ओपनर म्हणून रोहितचं हे पहिलं गोल्डन डक आहे.
0 वर 3 विकेट गमावणाऱ्या टीम्स
पाकिस्तान विरुद्ध न्यूजीलंड, एजबेस्टन, वर्ल्ड कप 1983
पाकिस्तान विरुद्ध साऊथ आफ्रिका, लाहोर, 1997
बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका, पीटरमॅरिट्जबर्ग, वर्ल्ड कप 2003
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश, मीरपुर, 2026
भारत विरुद्ध न्यूजीलंड, माउंट माउंगानुई, 2026
