महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा जळगावात विजय, अंजली पाटलांचा विजय का अभिमानास्पद ?

| Updated on: Jan 18, 2021 | 3:02 PM

ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यातील एकमेव तृतीयपंथी उमेदवार असलेल्या अंजली पाटील विजयी झाल्या आहेत (Trangender Anjali Patil Candidate win Gampanchayat Election)

महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा जळगावात विजय, अंजली पाटलांचा विजय का अभिमानास्पद ?
Follow us on

जळगाव : आपल्या राज्याला नेहमीच पुरोगामी महाराष्ट्र असं म्हटलं जातं. पुरोगामी महाराष्ट्राची मोठी पंरपरा आहे. आपल्या साधु-संतांच्या ओव्यांमधून नेहमीच पुरोगामीत्वाची जाणीव होते. या महाराष्ट्राने पुरोगामीत्वाचं आणखी एक नवं उदाहरण डोळ्यांसमोर उभं केलं आहे. ते म्हणजे जळगवाच्या भादली बुद्रूक गावात अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवाराला ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मतांनी विजय मिळवून देण्यात आलं आहे. भादली बुद्रूकच्या गावकऱ्यांच्या या निर्णयाचं खरंच स्वागत करायला हवं. कारण तृतीयपंथींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. त्यांच्याकडेही जबाबदारी दिली तर ते नक्कीच लोककल्याणाची कामे करुन दाखवतील, असा विश्वास खेडेगावातल्या गावकऱ्यांनी दाखवला आहे. गावकऱ्यांच्या या पावालाने समाजाता एक सकारात्मक बदलास सुरुवात झाली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. शिवसेना आणि भाजपात चुरशीची लढत बघायला मिळत आहे. या निवडणुकीत राज्यातील एकमेव तृतीयपंथी उमेदवार असलेल्या अंजली पाटील विजयी झाल्या आहेत. अंजली या जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वार्ड क्र. चारमधून उभ्या होत्या. त्यांचा ग्रामपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते विजयापर्यंत प्रचंड संघर्ष बघायला मिळाला. सुरुवातीला त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, त्यांनी यशस्वी लढा देत उमेदवार अर्ज दाखल केला आणि त्यापुढे जाऊन त्यांनी निवडणूकही जिंकून दाखवली आहे (Trangender Anjali Patil Candidate win Gampanchayat Election).


ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना नावापुढे लिंगाचा उल्लेख इतर असा केल्याने त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली होती. याबाबत अंजली पाटील यांनी आपल्या उमेदवारीसाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. न्यायालयाने अंजली पाटील यांच्या बाजूने निकाल देत त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला होता.

भादली बुद्रुकच्या ग्रामस्थांनाही अंजलीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आजवर गावाने अनेक निवडणुका पाहिल्यात. अनेकांनी विकासाची स्वप्ने दाखवून मते घेतली, निवडूनही आले. पण गाव आहे तसेच आहे. त्यामुळे अंजली आपल्यासाठी काहीतरी करेल, अशी ग्रामस्थांना अपेक्षा आहे (Trangender Anjali Patil Candidate win Gampanchayat Election).

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021: आम्ही 6 हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायती जिंकू, भाजपचा दावा

विखेंच्या भाचीने करुन दाखवलं, राष्ट्रवादीच्या आमदाराची दहा वर्षांची सत्ता खालसा