Maharashtra IAS Officers Transfer : राज्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या, कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश? वाचा सविस्तर

| Updated on: Jul 13, 2021 | 9:44 PM

राज्य सरकारने आज 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात ओ. पी. गुप्ता, रुबल अग्रवाल, दीपककुमार मीना, राहुल रेखावार, दौलत देसाई अशा अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Maharashtra IAS Officers Transfer : राज्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या, कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश? वाचा सविस्तर
महाराष्ट्र मंत्रालय
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरुच आहे. आज पुन्हा एकदा महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांसह काही जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचाही समावेश आहे. राज्य सरकारने आज 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात ओ. पी. गुप्ता, रुबल अग्रवाल, दीपककुमार मीना, राहुल रेखावार, दौलत देसाई अशा अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बदल्या करण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांची यादी वाचा सविस्तर (Transfers of 20 important IAS officers in Maharashtra)

1 .ओ. पी. गुप्ता (1992 च्या बॅचचे आएएस अधिकारी) यांची उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिव पदावरुन आता वित्त विभागात प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

2. विकास चंद्र रस्तोगी (1995 च्या बॅचचे आयएएस अधिकारी) यांची सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव पदावरुन आता उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, प्रधान सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

3. इंद्रा मल्लो (1999 च्या बॅचच्या आएएस अधिकारी) यांची एकात्मिक बालविकास योजना, नवी मुंबईचे आयुक्त पदावरुन सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई इथं प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

4. अजित पाटील (2007च्या बॅचचे आयएएस अधिकारी) यांची सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई इथून सहसचिव पदावरुन मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई इथं नियुक्ती करण्यात आली आहे.

5. रुबल अग्रवाल (2008 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी) यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त पदावरुन आता आयसीडीसी नवी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

6. दौलत देसाई (आयएएस 2008 बॅच) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची बदली वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या संयुक्त सचिवपदी मुंबईत झाली.

7. रुचेश जयवंशी (आयएएस: एमएच: 2009) जिल्हाधिकारी, हिंगोली यांची बदली महिला व बाल विभाग, पुणे येथे आयुक्तपदी करण्यात आली.

8. संजय यादव (आयएएस: एमएच: 2009) यांची बदली एमएसआरडीसी, मुंबई येथे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक म्हणून झालीय.

9. शैलेश नवाल (आयएएस: एमएच: 2010), जिल्हाधिकारी, अमरावती यांना मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवपदी नियुक्त करण्यात आलंय.

10. आर. एच. ठाकरे (आयएएस: एमएच: 2010) यांना नागपूरच्या अतिरिक्त आदिवासी आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलंय.

11. जे. एस. पापळकर (आयएएस: एमएच: 2010) अकोला जिल्हाधिकारी यांची अकोला महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय

12. जी. एम. बोडके (आयएएस: एमएच: 2010)यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदावरून हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

13. राहुल अशोक रेखावार (आयएएस: एमएच: 2011) यांची अकोल्याचे एमएस एसिड कॉर्पोरेशन व्यवस्थापकीय संचालकपदावरून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय

14. रवींद्र बिनवडे (आयएएस: एमएच: 2012) यांची जालनाच्या जिल्हाधिकारी पदावरून थेट पुणे महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आलीय

15. दीपककुमार मीना (आयएएस: एमएच: 2013) यांची नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

16.  पवनीत कौर यांची अमरावतीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. याआधी त्यांच्याकडे पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदाचा कार्यभार होता.

17.  विजय चंद्रकांत राठोड यांना जालन्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

18. निमा अरोरा यांची अकोल्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

19. आंचल गोयल यांची परभणीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

20. डॉ. बी.एन.पाटील यांची रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

इतर बातम्या :

आदित्य ठाकरेंकडून महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर, वाचा 5 महत्त्वाची वैशिष्ट्ये

अमेझॉनवरुन स्पाय कॅमेरा मागवला, महिला डॉक्टरच्या बाथरुममध्ये बसवला, पुण्यातील MD जगतापला कोठडी

Transfers of 20 important IAS officers in Maharashtra