जे मराठी बोलणार नाहीत, त्यांचं काय करायचं हे ठरवण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईकांनी बोलावली अति महत्वाची बैठक

मुंबईसह राज्यातील अमराठी रिक्षाचालकांवर आजपासून कारवाई होणार आहे. याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे.

जे मराठी बोलणार नाहीत, त्यांचं काय करायचं हे ठरवण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईकांनी बोलावली अति महत्वाची बैठक
pratap sarnaik news
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 18, 2026 | 10:12 AM

राज्यात रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलण्याची सक्ती करण्यात आली आहे. अमराठी चालकांसाठी विशेष प्रशिक्षण वर्गाची व्यवस्थेची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. खरंतर रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपली असून आजपासून आरटीओकडून कारवाई केली जाणार आहे. परंतु या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर नेमकी काय कारवाई करायची, हे अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. त्यामुळे मराठी न बोलणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर नेमकी काय कारवाई करायची, याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

परप्रांतीय भाषिक रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी यावी, यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात येत आहे. विशेष म्हणजे परिवहन विभागाकडून अमराठी चालकांची परीक्षा देखील घेण्यात आली होती. परंतु या परीक्षेत तब्बल 7750 रिक्षाचालक नापास झाले आहेत. त्यामुळे अमराठी चालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आज मंगळवारपासून रिक्षा, टॅक्सी चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर नेमकी कारवाई करायची, ही बाब निश्चित करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर मराठी सक्ती निर्णयाबाबत परिवहन विभागाकडून उद्या मंत्रालयात अती महत्वाची बैठक बोलावली आहे. मंत्रालयातील उद्याच्या बैठकीत कारवाईची दिशा प्रताप सरनाईक ठरवणार आहेत .

परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून अधिकाऱ्यांना टॅक्सी चालकांना देण्यात आलेल्या परवान्याची आकडेवारी काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात ९, लाख १३ हजार रिक्षा चालकांना परवानगी देण्यात आली आहे. तर ६५ हजार टॅक्सी चालकांना परवानगी देण्यात आली आहे. राज्यात २५ ते ३० टक्केच मराठी रिक्षा चालक आहेत. तर ७० ते ७५ टक्के अमराठी भाषिक चालक आहेत. मात्र यापैकी मराठी भाषा शिकण्यासाठी केवळ १ लाख ६५ हजार नोंदीच आत्तापर्यंत झाल्या आहेत. या सगळ्यांवर कशा पद्धतीने कारवाई करायची, यासंदर्भात आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासोबत आज बैठक करणार असल्याची माहिती हाती आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us