AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना

महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना

| Updated on: Oct 03, 2026 | 5:41 PM
Share

पुणे शिक्षक मतदारसंघात मंगेश चिवटे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ही कार्यवाही होणार असून, यामुळे महायुतीमध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघासाठी बैठक झाली, तर मुंबईत ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चाची पाहणी मनसे आणि ठाकरे गटाकडून करण्यात आली.

पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच त्यांना अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चिवटेंच्या या उमेदवारीमुळे महायुतीमध्ये सध्या रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघातील या उमेदवारीवरून महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीतून काँग्रेस नेते बाहेर पडले असले तरी, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चर्चा करत आहेत. दरम्यान, मुंबईत होणाऱ्या गर्जना मोर्चापूर्वी मनसे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेसह नेत्यांनी पाहणी केली. मेट्रो सिनेमा ते मुंबई पालिका मुख्यालय या परिसराची बाळा नांदगावकर, यशवंत किल्लेदार, मिलिंद नार्वेकर, अनिल परब आणि नितीन सरदेसाई यांच्यासह प्रमुख नेत्यांनी पाहणी केली. उद्या ठाकरे बंधू हा मोर्चा काढणार असून, इतर राजकीय पक्षांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Published on: Oct 03, 2026 05:25 PM

Follow Us