Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…

Tukaram Mundhe FDA Actions: तुकाराम मुंढे सध्या महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून काम सांभाळत आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्नसुरक्षेची तपासणी आणि कारवाईने झपाट्याने वेग घेतला आहे.

Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा...
| Updated on: Aug 25, 2026 | 8:54 AM

Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढे सध्या महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून काम सांभाळत आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्नसुरक्षेची तपासणी आणि कारवाईने झपाट्याने वेग घेतला आहे. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, रस्त्यावरील खाद्यविक्रेते तसेच ऑनलाइन माध्यमातून खाद्यपदार्थ विकणाऱ्या आस्थापनांची सतत तपासणी केली जात आहे. नियमांचे थोडेही उल्लंघन आढळल्यास थेट परवाना निलंबन केला जात आहे. दूध भेसळ, खाद्यपदार्थांची स्वच्छता, शाळांच्या परिसरातील जंक फूड आणि प्रतिबंधित गुटखा-तंबाखूजन्य पदार्थ यांसारख्या मुद्द्यांवरही लक्ष दिलं जात आहे. पण आता तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा ज्या दिशेने वळवला आहे ते आता मुंबईकरांसाठी अगदीचे आवडीचे आहे.

मुंबईकरांचा अत्यंत आवडीचा आणि रस्त्यावरील गाड्यांवर सर्वाधिक विकला जाणारा ‘ट्रिपल शेजवान फ्राईड राईस’  आता FDA च्या रडारवर आले आहे, फ्राईड राईस सोबतच इतर चायनीज पदार्थही आता अन्न व औषध प्रशासनाच्या थेट रडारवर आले आहेत. मुंबईतील चायनीज फूडच्या अस्वच्छतेच्या तक्रारींची दखल आता FDA कडून घेतली गेली. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने ही चायनीज हॉटेलवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

FDA ने केलेल्या तपासणीत मुलुंड येथील चायना टाउन फास्ट फूड सेंटरमध्ये अत्यंत गंभीर त्रुटी उघडकीस आल्याचा प्रकार समोर आला आहे. चायनीज पदार्थांमध्ये कृत्रिम रंग आणि मोनोसोडियम ग्लुटामेट किंवा अजिनोमोटोचा अतिवापर होत आहे, तसेच वारंवार वापरलेले खराब तेल पुन्हा पुन्हा वापरले जात आहे. एवढच नाही तर हॉटेलमध्ये झुरळांचा प्रादुर्भावही पाहायला मिळाला. अत्यंत अस्वच्छ ठिकाणी अन्न साठवणूक केलेली हेती, सांडपाण्याचा योग्य निचरा केला नसल्याने शेवाळ, घाण आणि दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरली होती. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी एकच जागा आणि एकाच प्रकारची उपकरणे वापरली जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
मुलुंडप्रमाणेच माहीम येथील लेनेक्सिस फूडवर्क लिमिटेड या आस्थापनेवरही FDA ने धाड टाकली. तपासणीदरम्यान या ठिकाणी किचनमध्ये पुरेशी व्हेंटिलेशन व्यवस्था नसल्याचे आढळले. तसेच येथील एक्सहॉस्ट सिस्टीम आणि किचन हूड फिल्टर्सवर तेलाचे जाड थर साचल्याचे पाहायला मिळाले.
दोन्ही आस्थापनांमध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या मानकांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्टपणे दिसत होते. यामुळे FDA कडून ही कठोर पावले उचलण्यात आली. या कारवाईमुळे मुंबईतील इतर चायनीज गाडी आणि हॉटेल्स चालकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. दादर छत्रपती  शिवाजी पार्कमधील कॅफ कॅडेलचा अन्न परवाना FDAकडून निलंबित करण्यात आला. 20 ऑगस्ट 2026 रोजी अन्न सुरक्षा विभागाकडून कॅफ कॅडेलची तपासणी केली गेली. यावेळी अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी निर्दशनास आल्या. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगळे ठेवण्याची व्यवस्था नसल्याचे आढळले. स्वयंपाकाची उपकरणे आणि कटलरीची योग्य स्वच्छता व निर्जंतुकीकरण वारंवार होत नसल्याचे समजले. पिण्याच्या पाण्याच्या तपासणीच्या आवश्यक नोंदीही उपलब्ध नव्हती. या सर्व त्रुटींमुळे कॅफ कॅडेलचा FSSAI परवाना तातडीने निलंबित करण्यात आला.
Follow Us