टीव्ही 9 मराठी इम्पॅक्ट : एपीएमसी मार्केटमध्ये एफडीएची मोठी कारवाई! प्रतिबंधात्मक गुटखा जप्त, 8 ते 10 जण ताब्यात

| Updated on: Feb 11, 2021 | 6:08 PM

एपीएमसी मार्केटमध्ये मोठा प्रमाणात गुटखा विकला जातोय, अशी बातमी टीव्ही 9 मराठीने बातमी दाखवल्यानंतर tv9 marathi impact fda seized gutkha from Mumbai APMC

टीव्ही 9 मराठी इम्पॅक्ट : एपीएमसी मार्केटमध्ये एफडीएची मोठी कारवाई! प्रतिबंधात्मक गुटखा जप्त, 8 ते 10 जण ताब्यात
मुंबई एपीएमसीमधून गुटखा जप्त करण्यात आला
Follow us on

नवी मुंबई: एपीएमसी मार्केटमध्ये मोठा प्रमाणात गुटखा विकला जातोय, अशी बातमी टीव्ही 9 मराठीने बातमी दाखवल्यानंतर एपीएमसी मार्केटमध्ये एफडीएनं मोठी कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासनानं गुटखा विक्री करणाऱ्या 8 ते 10 जणांना ताब्यात घेण्यात आलयं. अन्न औषध प्रशासन विभागाकडून एपीएमसी मार्केट मध्ये गुटखा विक्रेत्यांवर आज मोठी कारवाई करण्यात आली. अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सुरेश देखमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 20 ते 25 अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रतिबंधात्मक गुटखा विकणाऱ्यांवर कारवाई केली. (tv9 marathi impact fda seized gutkha from Mumbai APMC)

पाचही मार्केटमधून गुटखा जप्त

एपीएमसी परिसरातील पाचही मार्केटमधून पान टपऱ्यावर विकला जाणारा प्रतिबंधात्मक गुटखा जप्त करण्यात आला आहे. यापूर्वी एफडीएने एपीएमसी भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये 5 पान टपऱ्या सील केल्या होत्या. शिवाय 4 जणांना अटक करून एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. यामध्ये मुख्य सूत्रधार गुटखा किंग राजन गुप्ता उर्फ मुन्ना कित्येक वर्षांपासून गुटख्याचं व्यवसाय करत असल्याचं समोर आले होते. मुन्ना बेलापूर विधानसभा उत्तर भारतीय शहर संघटक होता यामध्ये महत्वाचे बाबा असे आहे की मुन्ना तुरुंगात असताना त्याचा धंदा मोठ्या तेजीत मार्केटमध्ये चालत होता.

आशियातील मोठी बाजार समिती

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे संपूर्ण नवी मुंबई परिसरात नशाबंदी अभियान सुरु आहे. तर, दुसरीकडे मात्र मुंबई एपीएमसीतील 5 ही मार्केटमध्ये गुटखा आणि नशेचे पदार्थ बिनधास्तपणे विकले जात होते. आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उप्तन्न बाजार समितीमध्ये दररोज हजारो लोकांची वर्दळ असते. जवळपास 10 ते 15 हजार परप्रांतीय कामगार आणि किरकोळ व्यापारी मार्केटमध्ये अनधिकृतपणे राहत असल्याने सर्वात जास्त गुटखा विक्री येथे होते.

मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा विक्री

एपीएमसी परिसरातील 123 पैकी जवळपास 100 टपऱ्यामंध्ये गुटखा विक्री केली जात असल्याचं समोर आलं होतं. एपीएमसी पोलीस व अन्न औषधी प्रशासन विभागाकडून वारंवार एपीएमसी प्रशासनाला पत्र देउन सुद्धा यावर कारवाई होत नव्हती. मार्केटमध्ये जवळपास 20 ते 30 गोणी गुटख्याचा खप असून शौचालय, मार्केटमधील विविध विंगमध्ये अल्पवयीन मुले आणि काही महिलांकडून गुटखा विक्री केली जाते. संपूर्ण नवी मुंबईत जेवढा गुटखा विकला जात नाही, तेवढा गुटखा एपीएमसी परिसरात विकला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईत कोरोना प्रतिबंधात्मक नियम धाब्यावर, मनपा आयुक्तांची नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी

Farmers protest: नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट उद्या बंद; माथाडी कामगारही संपावर

(tv9 marathi impact fda seized gutkha from Mumbai APMC)