मुंबईत कोरोना प्रतिबंधात्मक नियम धाब्यावर, मनपा आयुक्तांची नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी

महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी शहरात पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी केली आहे. (Iqbal Singh curfew Mumbai)

मुंबईत कोरोना प्रतिबंधात्मक नियम धाब्यावर, मनपा आयुक्तांची नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी
मुंबईत लॉकडाऊनच्या हालचालींना वेग
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 7:21 PM

मुंबई : नागरिक कोरोना नियम पाळत नसल्याचे लक्षात आल्यामुळे महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी शहरात पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी केली आहे. नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळत नसल्यामुळे आयुक्तानी राज्य सरकारकडे ही मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. (Municipal Commissioner Iqbal Singh Chahal demanded the imposition of night curfew in Mumbai)

अनलॉक अंतर्गत मुंबई शहरात निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळले जात नसल्याचे लक्षात आले आहे. शहरातील परळ-बांद्रा येथील एका नाईट क्लबवर महापालिकेने धाड टाकल्यानंतर ही बाब पुन्हा एकदा समोर आली. महापालिकेने शहरातील इतरही नाईट क्लबवर धाडी टाकल्या आहेत. यावेळी, नाईट क्लबमध्ये हजारो लोक विनामास्क असल्याचे आढळले. ही सर्व परिस्थिती पाहता, मुंबईत पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी महापालिका आयुक्तांनी केली.

मुंबईत कोरोनाग्रस्तांची स्थिती काय?

महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहरात सध्या 2 लाख 87 हजार 898 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर आतापर्यंत एकूण 2 लाख 64 हजार ,228 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तसेच, सध्या 11 हजार 903 जणांवर उपचार सरु असून आतापर्यंत 10 हजार 929 जणांचा कोरोमुळे मृत्यू झालेला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर पोहोचले आहे.

लसीच्या साठवणुकीसाठी पालिकेची तयारी

कोव्हिड लसीच्या साठवणुकीसाठी कांजूरमार्ग आरोग्य विभागाच्या इमारतीत 5 हजार स्के. फूट जागा निश्चित केली आहे. यात जागेत मुंबईला पुरवठा होणाऱ्या लसीची साठवणूक केली जाईल. यासाठी लवकरच ई-टेंडरची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. येत्या जानेवारी महिन्यात या स्टोरेज रुमची सर्व तयारी करण्यात येईल, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.

दरम्यान, कोरोना लस सर्वप्रथम वैद्यकीय कर्मचारी, कोव्हिड विरोधातील लढ्यात प्रत्यक्ष सहभागी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी प्रत्येक विभागनिहाय माहिती घेऊन आरोग्य शिबिरं आयोजित केले जातील. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना लस देण्याची व्यवस्था केली जाईल, असेही पालिकेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. (Municipal Commissioner Iqbal Singh Chahal demanded the imposition of night curfew in the city)

संबंधित बातम्या : 

लसीकरणासाठी राज्य सरकारची समिती, शितगृहाबाबत उणिवा- आरोग्यमंत्री

केईएम, नायरपाठोपाठ सायन रुग्णालयातही कोरोना लसीची चाचणी, 1 हजार स्वयंसेवकांचा सहभाग

…म्हणून हॉटेल ताज पॅलेसची 8 कोटी 85 लाखांची थकबाकी पालिकेकडून माफ

(Municipal Commissioner Iqbal Singh Chahal demanded the imposition of night curfew in the city)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.