
आज दुपारी मुंबईत ओबीसीच्या प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक होणार आहे. मात्र या बैठकील तायवाडे जाणार नाहीत, विजय वडेट्टीवार या बैठकीस उपस्थित राहणार आहे, तर लक्ष्मण हाके बैठकीसाठी उपस्थिती राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईमध्ये विनापरवाना औषध विक्री 2 लाख 77 हजार रुपयांची औषधे जप्त करण्यात आली आहेत. कांदिवली पश्चिमेकडील चारकोप येथे मे. इंडियन ग्लोबलस्टोर कंपनीकडून परवान्याशिवाय औषध विक्री करण्यात येत असल्याचे आढळून आले. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आज पत्रकार परिषद घेणार आहेत, रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांबद्दल उत्तर देणार. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
धुळे शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील देवपूर भागात 12 श्वानांचा मृत्यू झाला आहे. देवपुरातील इंदिरा गार्डन परिसरातील वर्षा बिल्डिंगजवळ एकाच वेळी 12 श्वानांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या श्वानांच्या मृत्यूचे कारण काय आहे हे अद्याप समोर आलेले नाही.
नाशिकमधील नांदगावच्या बोलठाणमध्ये बच्चू कडू यांनी सरकारवर टीका केली आहे. ‘एकीकडे राज्यात ओला दुष्काळ पडला असून शेतकरी अडचणीत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला या सरकारला वेळ नाही. दुसरीकडे सरकार जातीजातीत वाद लावण्यात धन्यता मानत आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
काशिमीरा गुन्हे शाखेने थायलंड आणि म्यानमारमध्ये भारतीय तरुणांना फसवणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. प्रमुख एजंट आसिफ खान आणि रोहित मरडाणा यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
ओबीसी बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी म्हटले की, मराठ्यांवर जळणारे एवढे लोक का आहेत? यामुळे ते उघडे पडले, आपला खरा शत्रू कोण हे कळालं. आता परिणामाची चिंता करायची नाही विरोध करणारा संपवायचं एवढं मराठ्यांनी लक्षात घ्यावं.
करमाळ्यात इनोव्हा कार अन् दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू
करमाळा तालुक्यातील वीट येथील भुजबळ वस्तीजवळ भीषण अपघात
हनुमंत केरु फलफले (35), कांचन केरु फलफले आणि स्वाती शरद काशीद अशी मृतांची नावं
शिरूर तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे, कारेगाव येथील पुणे अहिल्यानगर महामार्गावर गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन जणांना जबर मारहाण करण्यात आली आहे, या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे, जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डोंबिवलीत सर्वपक्षीय हक्क समितीची बैठक
27 गावं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून वेगळी करण्याच्या मागणीसाठी बैठक
27 गावं वेगळी करून त्यांची स्वतंत्र पालिक तयार करण्याची मागणी
बैठकीला खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांची उपस्थिती
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला सहकार विभागाने परवानगी दिली आहे. 559 पदांच्या भरतीला सहकार खात्याने मंजूरी दिली आहे. त्यामुळेसहकार विभागाच्या मंजूरीमुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना धक्का मिळाला आहे. बँकेच्या गैरकारभार,नोकर भरती आणि भ्रष्टाचार प्रकरणी स्थगित असणारी चौकशी पुन्हा सुरू करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपुर्वी जाहीर केले होते.
ओबीसी आणि मराठा समाजावर अन्याय होणार नाही ही जबाबदारी आम्ही घेऊ.कुणबी – ओबीसीचे खोटी प्रमाणपत्र बनवणारे आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई होईल असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
गौतमी पाटील हीची चूक असल्यास तिच्यावर करवाई करण्यात यावी अशी मागणी नेते रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
नंदूरबार – पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासमोर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या आहेत. पिकविमा काढण्याची सुरुवात ऑक्टोंबर -नोव्हेंबरमध्ये होत असते, मात्र पिक विमा जुलैमध्ये सुरू करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड परिसरात रस्त्यांची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, त्यावर केलेले निकृष्ट दर्जाचे काम प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना पडून अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर कोलाड नजीक फ्लायओव्हरचे काम रखडल्याने वाहतूक कोंडीची देखील समस्या या ठिकाणी निर्माण होत आहे
बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने शुबमन गिल याची भारतीय संघाच्या एकदिवसीय कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.
निलेश घायवळ च आधार कार्ड TV9 च्या हाती लागले आहे. जे आधार कार्ड देऊन पासपोर्ट मिळवला, त्यावर देखील गायवळ अस आडनाव लावले आहे. घ च्या ऐवजी ग लावत बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवला बनावट पासपोर्ट
अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत अनिल परब यांना उत्तर दिले आहे. त्यांनी अनिल परब यांना ‘चंद्रग्रहणाच्या दिवशी माझ्या आणि माझ्या मुलाच्या नावाने स्मशानभूमीत बोकड कुणी कापलं?’ असा थेट सवाल केला आहे.
धाराशिवमध्ये ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळतायत. धाराशिवमध्ये नियोजन भवनातील कार्यक्रमात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी कार्यक्रम बंद पाडला. जिल्हाधिकारी, आमदार राणा पाटील तसेच एसपींसमोर शेतकऱ्यांचा गोंधळ पाहायला मिळाला.
सुप्रीम कोर्टातील शिवसेनेच्या सुनावणीवर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले “दार ठोकून ठोकून न्याय मिळत नसेल तर करायचं काय? कोर्टात न्याय मिळत नाही पण दांडुका पडल्यावर न्याय मिळतो.” तसेच पुढे ते म्हणाले ‘ 2050 पर्यंत न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.” असं म्हणत त्यांनी चिमटाही काढला.
रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर सडकून टीका केली आहे. “बाळासाहेबांबाबत निर्माण केलेल्या प्रश्नावर, आरोपांवर उद्धव ठाकरेंनी बोलावं, हा चमचा मध्ये बोलणारा कोण?” असं म्हणत रामदास कदम यांनी अनिल परबांवर खोचक टीका केली आहे. तसेच त्यांच्या पत्नीबद्दल केलेल्या वक्तव्यावर रामदास कदम परबांविरोधत कोर्टात जाणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं.
बाळासाहेबांबात CBI चौकशीची मागणी करणार असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. CBI चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचं देखील रामदास कदम म्हणाले.
चंद्रकांत पाटलांचा पाठोपाठ केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील केला वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला. सदर गुन्ह्यातील प्रोग्रेस रिपोर्ट तात्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
वसईत आज अकरा वाजता धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईच्या वसंत नागरी परिसरात अचानक गॅस पाईपलाईन लिकेज होऊन, बाजूची पाण्यासह जमीन फाडून फवारे बाहेर आले आहेत.गॅस आणि पान्याचे एकत्र फवारे बाहेर आल्याने जमीनला भेगा पडल्या आहेत. अचानक जमीनिला भेगा पडत गेल्याने स्थानिक नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून एकच धावपळ उडाली होती. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावर जावून बाहेर निघणार गॅस आणि पाणी बंद केल्याने मोठा अनर्थ टळला आहे
माझ्या पक्षाचं नाव शिवसेनाच आहे आणि शिवसेनाच राहिल. माझ्या पक्षाचं नाव हे माझ्या आजोबांनी दिलं आहे. माझ्या पक्षाचं नाव दुसऱ्याला ठेवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणारे हात महत्त्वाचे आहे. शिवाजी पार्कवर मी भाषण थांबवू का असे विचारले, पण पावसात आणि खाली चिखल असतानाही शिवसैनिकांनी भाषण सुरू ठेवण्याचा आग्रह धरला असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दसरा मेळावा अभूतपूर्व झाला. भाषणं सुरु झाल्यावर दरवाजा बंद करण्याची गरज वाटली नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
१९९३ मध्ये ज्योती रामदास कदम यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, जाळून घेण्याचा प्रयत्न केला. जाळून घेतलं की जाळलं? आजही खेडमध्ये घटनेचे साक्षीदार आहेत. गरज पडली तर त्यांनाही मी समोर आणेल. खूप साक्षीदार आहेत. म्हणून आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही संस्कृती बंद करा, असा घणाघात उद्धव सेनेचे नेते अनिल परब यांनी केला.
गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरण. जखमी असलेल्या व्यक्तीचे नातेवाईक आक्रमक. पोलीस मॅनेज झाले असल्याचा मुलगी अपर्णा मरगळे यांचा आरोप. हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी असलेले समाजी विठ्ठल मरगळे यांच्यावर पोलीस दबाव टाकत असल्याचा मुलीचा आरोप.
“बाळासाहेबांच्या अंतिम क्षणी मी २४ तास तिकडे होतो. प्रत्येक क्षणाला मी जी घटना पाहिली, घडलेली आहे, त्याचा मी साक्षीदार आहे. रामदास कदम हे आता बाळासाहेब गेल्यावर त्यांना १४-१५ वर्षानंतर त्यांना कंठ फुटला” असं अनिल परब म्हणाले.
गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणात पोलिसांवर दबाव वाढला. चंद्रकांत पाटलांपाठोपाठ केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील केला वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन. सदर गुन्ह्यातील प्रोग्रेस रिपोर्ट तात्काळ सादर करा. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा आदेश.
गौतमी पाटीलवर कारवाईची मागणी. जखमी व्यक्तीच्या मुलीने घेतली केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट. या अपघातात जखमी असलेल्या संभाजी मरगळे यांची मुलगी अपर्णा मरगळे यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली.
चारचाकी टेम्पो रिक्षा च्या काचा फोडण्यात आल्या… ५ ते १० गाड्यांची केली तोडफोड… दहशत माजवण्यासाठी गाड्यांची तोडफोड… काशीवाडी आणि लोहियानगर या भागात काही अज्ञात लोकांनी गाड्यांची तोडफोड केली… रस्त्यावर उभा केलेल्या गाड्यांची केली तोडफोड… पोलिस अधिक तपास केलं आहे…
प्रमाणपत्र वाटप करण्यास सुरुवात करा, नाही तर अवघड होईल… काँग्रेस मराठ्यांविरोधात खूप बोलायला लागलेत… काँग्रेस मराठ्यांचे उपकार फेडायला लागले आहेत… असं वाटतं… जरांगे पाटील
त्यांचं एकून एकही पाऊल उचलू नका… दिवाळीच्या आत कुणबी प्रमाणपत्र वाटप करा… हैदराबाद गॅझेटप्रमाणे मराठ्यांना प्रमाणपत्र वाटप करा… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे…
जीआर रद्द करणं कुणाच्या बापाची पेंड आहे का? आता आम्ही दयामाया कमी केली आहे… भुजबळ सगळ्या माळ्यांचा नाही तर थोड्याच माळ्यांचा नेता… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.
स्मार्ट सिटीत ‘झाडं तोडा, स्टॉल जोडा’चा घाट. अधिकृत फूड प्लाझा बंद, मात्र लोखंडी स्टॉल्ससाठी झाडांची कत्तल. मॉर्निंग वॉकर्स संतापले; ‘वॉर्म-अप’ची जागा बळकावली: “आम्ही फिरायचं कुठे?” कल्याणकरांचा प्रशासनाला संतप्त सवाल.
राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने मराठवाडा विदर्भ आणि धाराशिव या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीच मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे आता भाजीपाला मध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे दादरच्या भाजीपाला मार्केटमध्ये
भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे,
मुंबईत फक्त बाळासाहेबांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा, शिंदे आणि त्यांच्या लोकांना लोक एक दिवस कोंडून ठेवतील, असे राऊतांनी म्हटले.
रामदास कदमांना किंमत मोजावी लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे रामदास कदम यांना मोठा दावा बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युबद्दल केला आहे.
नुकताच संजय राऊत यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे यांना बदनाम केले जात आहे. रामदास कदम यांनी केलेल्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. अण्णाभाऊ साठे सभागृहात मेळावा पार पडणार असून उद्धव ठाकरे हे शाखाप्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वैदुवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण विभागाचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. वैदुवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक कार्यरत आहेत तीन, विद्यार्थी संख्या आहे आठ.
मात्र आज प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची हजर संख्या शून्य तर शिक्षक मात्र एकच हजर होता. पटसंख्या कमी असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील 35 शिक्षकांना यापूर्वी मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी निलंबित केले होते आणि निलंबित शिक्षकांना पटसंख्या वाढवण्यासाठी एक महिन्याचा वेळ देण्यात आला होता. मात्र तरीही सुधारणा झालेली दिसली नाही.
सोलापूर – मनसे शेतकरी सेनेकडून माढ्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. मनसे शेतकरी सेनेच्या नेत्यांनी वाढदिवसाचा खर्च टाळत पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. माढा तालुक्यातील राहुलनगर गावात पूरग्रस्तांना चप्पल, बूट, कोलगेट, टूथ पेस्ट, वही, पेन आणि किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
सीना नदीला आलेल्या पुरामुळे माढा तालुक्यातील राहुल नगर पूर्णपणे पाण्यात होतं. त्यामुळे मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना साहित्याचे वाटप करण्यात आले
पुण्याच्या मंचरमध्ये पेट्रोल पंपावर दरोडा. मंचर मधील तांबडे मळा येथील इंडियन पेट्रोल पंपावर चार सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ, पेट्रोल पंपावरील रोकड घेवून दरोडेखोरांनी पोबारा केला. दरोडेखोरांनी पिस्तूल मधून हवेत गोळीबार करत कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं. दरोड्यानंतर दरोडेखोरांनी नारायणगावच्या दिशेने पळ काढला, मंचर पोलिसांनी तात्काळ नाकेबंदी सुरू केली आहे.
नाशिक – मुख्यमंत्री आज मुंबईत कुंभमेळा कामाची आढावा बैठक घेणार . उपमुख्यमंत्री, कुंभमेळा मंत्री, यांच्यासह मंत्री समितीचे सदस्य उपस्थित राहणार . नाशिक जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला जाणार. जिल्ह्यात सुरू असणारे असणारे कामे आणि पुढील कामाच्या नियोजना संदर्भात बैठक होणार आहे.
गर्दीच्या रेट्यामुळे धावत्या लोकलमधून पडून महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. गणेश जगदाळे (वय 31) असे मृत जवानाचे नाव असून ते दहिसर शहर पोलिस ठाण्यात कार्यरत होते.
शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ते ड्युटी संपवून दहिसर स्थानकातून नायगावला जाण्यासाठी लोकल पकडली. मात्र प्रचंड गर्दीमुळे ते दरवाज्याजवळ उभे असताना मालाड-गोरेगाव दरम्यान धक्काबुक्की झाली आणि ते रुळावर पडले. गंभीर दुखापतीमुळे त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात येणार आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली. पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांची पोलीस आयुक्तांशी चर्चा झाली. निलेश घायवळ याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवल्याचं उघड झालं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आज पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरेंसंदर्भात उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर परब हे उत्तर देतील.