
महापालिकाने बजावलेल्या नोटीसला दर्गा ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात आव्हन दिले आहे. मनपाच्या नोटीस विरोधात उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली नसल्याचा सुप्रिम कोर्टात दर्गा ट्रस्ट कडून युक्तिवाद करण्यात आला आहे…. महापालिकाने अतिक्रमण मोहीम राबविल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. याप्रकरणी आता पुढील सुनावणी 21 एप्रिलला होणार आहे. कल्याण-डोंबिवलीत मैदानासाठी आरक्षित 84 भूखंडांपैकी निम्म्याहून अधिक भूखंडावर अतिक्रमण करण्यात आलं आहे. अतिक्रमणग्रस्त भूखंड सोडून कल्याणच्या प्रसिद्ध सुभाष मैदानातच क्रीडा संकुल का? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या मशाल आंदोलनाची सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. मुंबई मंत्रालयात गुरुवारी दुपारी 12 वाजता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत बच्चू कडू यांच्यासह शेतकऱ्यांची बैठक होणार आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा या मागणीसाठी बच्चू कडू यांनी 11 तारखेला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर मशाल आंदोलन केलं होतं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वरून बच्चू कडू आणि प्रहार संघटना आक्रमक झाली आहे… अशाच देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या.
नव्या वक्फ कायद्याला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने तुर्तास स्थगिती दिली आहे. समितींवर सध्या नव्या नेमनुका नको असं कोर्टाने सांगितलं आहे. तसेच यावरील पुढील सुनावनी आता 5 मे रोजी दुपारी 2 वाजता होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुढच्या सुनावनीवेळी फक्त 5 याचिकाकर्त्यांनी उपस्थित राहावं असही कोर्टाने सांगितलं आहे. याचिकांवर उत्तर देण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून केंद्र सरकारला 7 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे,
ठाण्यातील कोर्टनाका परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षांकडून आंदोलन करण्यात आलं आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केल्याच्या विरोधात ठाण्यातील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विक्रांत चव्हाणसह इतर पदाधिकारी यांनी निदर्शन केलं आहे. हातात फलक घेऊन मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. भाजप सरकार हिंदूंमध्ये द्वेष निर्माण करत असल्याचा आरोपही केला जात आहे.
घरातील दरवाज्यात झोपलेल्या तरूणावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. कोल्हापूरमधील इचलकरंजीतील ही दुर्दैवी घटना असून सूरज गोरवे तरूण जबर जखमी झाला आहे. त्याच्यावर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नारळी सप्ताह निमित्त होणारा धनंजय मुंडे यांचा पिंपळनेर दौरा रद्द झाला आहे.
सकाळी दहा वाजल्यापासून मुंबई विमानतळावर आहे मात्र काही तांत्रिक कारणांनी उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्याने हा दौरा रद्द केला जात आहे. स्वतः धनंजय मुंडे यांनी याबाबत ट्विट करत ही माहिती दिली.
मी पिंपळनेर (ता. शिरूर कासार) येथील संत श्री भगवानबाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताहात येण्यासाठी सकाळी साधारण दहा वाजल्यापासून मुंबई येथील पवन हंस विमानतळावर आहे. मात्र काही तांत्रिक कारणांनी अजूनही उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्याने माझा आजचा पिंपळनेर (शिरूर कासार) दौरा जड…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 17, 2025
कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचा मूक मोर्चा, गिरीश फोंडेंचं निलंबन मागे घेण्याची करण्यात येत आहे मागणी.
नाशिक शहरात परवा रात्री जी घटना झाली त्यावर कठोर कारवाई करत आहोत. या प्रकरणी जागेवरच 15 जणांना अटक करण्यात आली आहे. 54 जणांनाची नावे गुन्ह्यात टाकली आहे. अधिक नावे येत आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे. माथी भडकवली जात असल्याची आमच्याकडे माहिती होती. यात ज्यांचा सहभाग आहे, त्यांची नावे मिळाली आहेत. आम्ही तपास करत आहोत. आम्ही कुणाचीही राजकीय पार्श्वभूमी आम्ही बघत नाही. 1400 ते 1500 लोकांना समजावणे सुरू होते. यावेळी 21 पोलीस जखमी, गाड्या फुटल्या आहेत, अशी माहिती नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरण ताजे असतानाच आता नागरिकांच्या हातपायाच्या नखांची गळती व्हायला लागली असून नागरिक हैराण झाले आहेत. आतापर्यंत नख गळतीचे तब्बल 29 रुग्ण आढळले असून तपासणी सुरू आहे. मागील तीन महिन्यापूर्वी केस गळती होऊनही अद्याप icmr चा अहवाल समोर आला नाही. मात्र पुन्हा आता नखं गळती होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठोपाठ माजी खासदार संभाजी राजे यांनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी केली आहे. यापूर्वी मी सविस्तर सांगितलं आहे. इतिहासात वाघ्या कुत्र्याचा उल्लेखच नसताना दंतकथेतून हा कुत्रा निर्माण झाला आहे. त्यामुळेच त्याचा पुतळा हटवला पाहिजे. मी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी करणार आहे, असं संभाजी राजे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मेट्रो -7 अ’ची पाहणी केली. मेट्रोचं काम कुठपर्यंत आलंय, बोगद्याचं काम पूर्ण झालं का? याची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. तसेच यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्याकडून कामाच आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या कामावर समाधान व्यक्त केलं.
नाशिक जिल्हा बँकेत 182 कोटी वसुली प्रकरणी प्रशासनाने तीन संचालकांना दिले अभय देण्यात आले. जिल्हा बँकेचे माजी संचालक अद्वय हिरे परवेज कोकणी आणि अनिल आहेर यांना नोटीसा बजावण्यात आल्या नाहीत. सहकारमंत्र्यांच्या सुनावणीमध्ये हा प्रकार उघड झाला
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कराळी येथे मंगळवारी रात्री एका जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली होती. यामधील रुग्णांची संख्या आता 79 वर पोहचली आहे.
मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारणीचे काम पूर्णत्वास आले आहे. चौथऱ्यापासून हा पुतळा 84 फूट तर केवळ पुतळा 60 फूट इतका उंच आहे.
हिंसाचार करणारे हे संघ कार्यालयाचे कुलूप तोडणार होते, असे हर्षवर्धन सपकाळ यांचे वक्तव्य हास्यास्पद असल्याचे जोशी म्हणाले. संघाच्या कुलुपाला हात लावेल अशी कुणाच्या*** हिंमत नाही. हर्षवर्धन सपकाळ यांच्या *** मध्ये सुद्धा ती हिंमत नाही, अशी व्यक्तिगत टीका भाजप नेते संदीप जोशी यांनी केली.
सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू करण्याबाबत आज निर्णय होणार आहे. विमानसेवेची तारीख ठरविण्यासाठी फ्लाय 91 या कंपनीने आज वरिष्ठ अधिकार्यांची मुंबईत बैठक बोलावली आहे.
गोंदिया जिल्ह्यात थकीत विद्युत बिलामुळे 69 शाळांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. ऐन परीक्षेच्या काळात उष्णतेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील शाळांवर 5 लाख 80 हजार रुपयांचे विद्युत बिल थकीत आहे.
काँग्रेसचे बडे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर टीकेची झोड उठवली होती. त्यावरून आमदार संदीप जोशी आणि वडेट्टीवार यांच्यात कलगीतुरा सुरू झाला. आपली संस्कृती सांगते की कोणी गेल्यावर त्यांच्यावर कोणी बोलू नये. मंगेशकर कुटुंबिय लुटारुंची टोळी आहे, असं कसं म्हणू शकते? ठाकरे कुटुंबिय यावर काही बोलत नाही. आज बाळासाहेब ठाकरे असते तर विजय वडेट्टीवार यांना झोडपून काढलं असतं, अशी घणाघाती टीका संदीप जोशी यांनी केली.
निफाड- विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्याची शेतकरी संघटनेकडून होळी करण्यात आली. कर्जमाफी, शेतमालाच्या बाजारभावासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात येत आहे. सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याचा आरोप त्यांनी केलाय.
“मालवणमधील शिवरायांचा पहिला पुतळा का कोसळला? पहिल्या पुतळ्याचे गुन्हेगार अजून मोकाट का? नव्या पुतळ्याचं अनावरण होण्याआधी उत्तर द्या,” अशी मागणी संजय राऊतांनी केली.
“बाळासाहेबांच्या नावाने बनावट शिवसेना अमित शाहांनी स्थापन केली. शाहांनी बनावट संघटना निर्माण केली. आनंद दिघेंच्या नावाने बनावट चित्रपट बनवले गेले. शाह आणि त्यांच्या पक्षाकडून फक्त फोडाफोडी सुरू आहे,” अशी टीका संजय राऊतांनी केली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात गेल्या तीन तासापासून इंटरनेट सेवा बंद आहे. इंटरनेट सेवा बंद पडल्याने ओपीडीसाठी आलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. ओपीडीमधील रुग्णांना टोकन मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागतेय. त्यामुळे वायसीएम रुग्णालयात मोठी गर्दी झाली आहे. सर्दी, खोकला, ताप अशा आजारांसाठी सकाळी ओपीडी असल्याने त्यावर मोठा परिणाम होत आहे.
नाशिक जिल्हा बँकेत 182 कोटी वसुली प्रकरणी प्रशासनाने तीन संचालकांना अभय दिलंय. जिल्हा बँकेचे माजी संचालक अद्वय हिरे, परवेज कोकणी आणि अनिल आहेर यांना नोटीसा बजावण्यात आल्या नाहीत. अनियमित कर्जवाटप केल्याप्रकरणी तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांसह 44 जणांवर ठपका आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह अनेक आमदार खासदार कलम 88 च्या चौकशी अहवालात जबाबदार आहेत. सहकारमंत्र्यांच्या सुनावणीमध्ये धक्कादायक प्रकार उघड झाला.
नाशिक- त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हिआयपी दर्शन तिकिटांचा काळाबाजार उघड झाला आहे. 200 रुपयांचं दर्शन पास तब्बल २ हजार रुपयांना विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. २२ मार्च रोजी प्रकरण समोर आलं होतं. त्याच्या तपासानंतर कारवाईला वेग आला आहे.
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे सीईओ अमित माचवे यांनी १५ एप्रिलला गुन्हा दाखल केला. संशयित नारायण मुर्तडक याच्याविरोधात ठकबाजीचा गुन्हा नोंद आहे. भाविकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाईची मागणी होत आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर माजी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यात कमालीचा संघर्ष निर्माण झाला होता. आज ते दोघेजण एका कार्यक्रमाचे निमित्त एकत्र येत आहेत .आज संत भगवान बाबा गडाचा नारळी सप्ताहाची सांगता शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर या गावी होणार आहे. यावेळी महंत नामदेव शास्त्री यांच्या काल्याचे किर्तन आहे. या ठिकाणी दोन्ही नेते एकाच मंचावर येतील.
नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई जाणवत आहे. नाशिक जिल्ह्यातील टँकरच्या संख्येत वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात २२ टँकरद्वारे ३४ फेऱ्या सुरू आहे. पाण्यासाठी ७ विहिरीही करण्यात आल्या अधिग्रहित केल्या आहे.
सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू करण्याबाबत आज निर्णय होणार आहे. विमानसेवेची तारीख ठरविण्यासाठी फ्लाय 91 या कंपनीने आज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. सोलापूर ते गोवा तसेच सोलापूर ते मुंबई याकरता कंपनीला रिफ्युल सेंटरची गरज आहे. त्याबाबतची मागणी कंपनीने डीजीसीकडे केली होती.
नाशिकमध्ये दर्गा दगडफेक प्रकरणी आतापर्यंत 25 जणांना अटक झाली आहे. त्यातील 14 जणांना न्यायालयात हजर असता 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. दर्गा दगडफेक प्रकरणी एकूण 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापुरातील पंचगंगा नदीनंतर आता जिल्ह्यातील कुंभी नदी देखील प्रदूषणाच्या विळख्यात आली आहे. कुंभी नदीतील दूषित पाण्यामुळे नदीतील हजारो मासे मृत झाले आहे. करवीर तालुक्यातील सांगरूळ, कुडीत्रे परिसरात कुंभी नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचे प्रकरण ताजे असताना ठाण्यात गर्भवती महिला आणि बाळाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी डॉक्टर विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2022 मध्ये हा प्रकार घडला होता. या प्रकरणात जिल्हा शासकीय रुग्णालयाने अहवाल तयार केला होता. या अहवालामध्ये एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी हलगर्जी केल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर बुधवारी याप्रकरणी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
पनवेल पुणे रेल्वे मार्गावर कर्जत रेल्वे ट्रकवर एका गुलाबी सुटकेसमधून महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे… हत्या करून मृतदेह बॅगमध्ये कोंबण्यात आला आणि धावत्या ट्रेनमधून तो फेकण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज… या आधी शीना बोरा हत्या प्रकरण, पेणमध्ये सुटकेसमधून सापडलेला मृतदेह आणि आता कर्जतमधील ही घटना… अशा सलग तीन प्रकरणांनी रायगड जिल्ह्यात नेमकं काय सुरू आहे, असा गंभीर सवाल निर्माण होतोय… सध्या पोलीस तांत्रिक तपासाच्या आधारे हत्येचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत… पण या प्रकरणांमुळे ‘सुटकेस बॉडीज’ ही भयानक संकल्पना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे!
अतिवृष्टीमुळे जीवेत अथवा वित्तहानी होऊ नये म्हणून कळवा खाडीपात्रातील दोन हजार झोपड्यांना ठाणे महापालिकेकडून रेड अलर्ट दिला आहे… कळवा प्रभाग समिती हद्दीतील खाडीपात्रात बेकायदा पद्धतीने वास्तव करणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन पालिकेने केले आहे… पावसाळ्याआधी तात्काळ जागा रिकाम्या करा जीवित हानी झाल्यास पालिका जबाबदार नाही अशा नोटीसा प्रशासनाने दिल्या..